Gautami Patil Sarkarnama
विदर्भ

Gautami Patil News : वाळूमाफियांच्या काेथुर्ण्यात गौतमी पाटील लावणार ठुमके !

Kouthurna - Bhandara : कार्यक्रमाचे प्रवेश पास ‘सरकारनामा’च्या हाती लागले आहेत.

अभिजीत घोरमारे

Bhandara District Political News : प्रशासनाकडून कितीही आडकाठी झाली तरी अदृश्य राजकीय वरदहस्त असलेले काेथुर्णा हे गाव वाळूमाफियांचे गाव म्हणून संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असल्याचे बोलले जाते. आता याच काेथुर्ण्यातील वाळूमाफियांची करमणूक करण्यासाठी सुप्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील गावात येऊन ठुमके लावणार आहे. (Doubts are being raised in the district whether this program will be done on time or not)

हा कार्यक्रम ऐन वेळेपर्यंत होईल की नाही, याबाबत जिल्ह्यात शंका कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, गौतमी पाटीलचा एवढा मोठा चाहता वर्ग आहे की गोंधळ उडतोच. त्यामुळे कार्यक्रमात उडणारा गोंधळ लक्षात घेता भंडारा पोलिसांचा ताण वाढणार आहे. २१ नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्यातील काेथुर्णा येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार आहे. गावातील तरुण ग्राम समिती काेथुर्णा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'समदं काही ओक्के'

या कार्यक्रमाला जरी महिनाभर शिल्लक असला तरी आतापासून आयोजक तयारीला लागले आहेत. अशात कार्यक्रमाचे प्रवेश पास ‘सरकारनामा’च्या हाती लागले आहेत. त्यामुळे कार्यक्रम अगदी "फिक्स" झाला आहे. आता दिवाळी सणादरम्यान हा कार्यक्रम असल्याने "समदं काही ओक्के" मानले जात आहे. गौतमी पाटील या नावानं आता महाराष्ट्राला वेड लावलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी गौतमीच्या एका कार्यक्रमाला जमते. एवढा मोठा तिचा चाहता वर्ग आहे. त्यातून भंडारा जिल्हा सुटणार कसा?

आता मूळ मुद्दा असा आहे, गौतमी पाटीलला कार्यक्रमाला बोलावणे खूप खर्चिक आहे. मानधनासाठी गौतमी पाटील लाखो रुपये घेते. तिला कार्यक्रमाला बोलावणे म्हणजे आयोजक रग्गड असणे गरजेचे आहे. त्यामुळे काेथुर्णावासीयांना तिचा खर्च परवडला कसा, हाच प्रश्न पडणे साहजिक आहे. याच उत्तर असे की, काेथर्ण्याला वैनगंगा नदी श्रीमंत बनवत आहे. येथील नदीपात्रातील वाळूला राज्यभर मागणी आहे. त्यामुळे काेथुर्णा गावात वाळू तस्करी आणि वाळूमाफिया दोन्ही आलेच. याच वाळूमाफियांच्या मनोरंजनासाठी गौतमी येत असल्याची चर्चा रंगली आहे.

पोलिसांचा कस लागणार

दरम्यान, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांद्वारे गोंधळ घातल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे भंडारा पोलिसांचा "कस" या कार्यक्रमावेळी लागणार आहे. अशात अहमदनगर (अहिल्याबाई होळकर) येथील नागापूर येथे गौतमीचा कार्यक्रमादरम्यान (एक ऑगस्ट २०२३) दगडफेकीची घटना घडली होती. या गोंधळामुळे गौतमी पाटीलला अर्ध्यावरच कार्यक्रम बंद करत काढता पाय घ्यावा लागला होता.

यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटीलने दिला आहे. गोंधळ झाल्यास मी कार्यक्रम करणार नाही, अशी भूमिका गौतमी पाटीलने जाहीर केली आहे. परिणामी आयोजकांवर मोठी जबाबदारी वाढली आहे. दरम्यान, "गौतमी तिथे वाद" हे समीकरण पक्के झाले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या विरोधात जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना एकवटल्या आहेत.

गौतमीचा कार्यक्रमाला विरोध करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गौतमीचे कार्यक्रम बघता भंडारा पोलिसांनी परवानगी दिली कशी, असाही प्रश्नही विचारला जात आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT