Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

घंटो का काम मिनटो मे, बच्चू कडुंनी सुरू केली अनोखी कर्तव्य यात्रा...

भ्रष्टाचार (Corruption) थांबविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून सेवेसाठी ही कर्तव्य यात्रा काढण्यात आली असल्याचे बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.

जयेश गावंडे

अकोला : अनोख्या आंदोलनांनी प्रसिद्ध असलेले राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू राज्यातील जनतेसाठी नवनवीन प्रयोग राबवीत असतात. शासकीय कार्यालयांमध्ये खेट घालून घालून सामान्य नागरिक त्रस्त होतात. त्यांना दिलासा देण्यासाठी बच्चू कडू यांनी आता ‘घंटो का काम मिनटो में’, हा एक नवीन प्रयोग सुरू केला आहे.

या यात्रेच्या माध्यमातून सामान्यांची कामे तात्काळ होतील, असा दावाही त्यांनी केला आहे. अकोल्यातून (Akola) या यात्रेची सुरुवात झाली असून राज्यभर (Maharashtra) हा प्रयोग राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांची शासकीय कार्यालयातील अडकलेली कामे तत्काळ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. भ्रष्टाचार (Corruption) थांबविण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून सेवेसाठी ही कर्तव्य यात्रा काढण्यात आली असल्याचे बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा या गावापासून कर्तव्य यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. कित्येक महिन्यांपासून अडकलेली कामे तत्काळ करण्यासाठी हा उपक्रम आहे. एखाद्या कामासाठी वेळप्रसंगी लोकांचा अपमान होतो, हे होऊ नये, म्हणून ही यात्रा काढण्यात आली आहे. सर्वच कामे एका ठिकाणी करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. जोपर्यंत सर्वांची कामे होणार नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही, असे पालकमंत्री कडू म्हणाले.

स्वतः ऐकली कैफियत..

संकल्प यात्रेच्या दरम्यान बच्चू कडू यांनी स्वतः लोकांची गाऱ्हाणी ऐकली. त्यांचे निवेदने स्वीकारून समस्या जाणून घेतल्या. काही तक्रारकर्त्यांना स्वतः सुनावणी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक महिला येथे आली आहे. तिचा पती सोडून गेला. आता जगण्याचे वांदे आहेत. अशा परिस्थितीत शासकीय कार्यालयात गेल्यास चार ठिकाणी फेऱ्या माराव्या लागतील. पण या ठिकाणी सर्वच विभागांचे स्टॉल लागलेले असल्यामुळे आजच्या आज या महिलेचे काम होऊन जाईल. हा या कर्तव्य यात्रेचा फायदा असल्याचे राज्यमंत्री कडू यांनी सांगितले.

सर्वच विभागांचे स्टॉल..

यावेळी सर्वांची कामे एकाच ठिकाणी व्हावी, यासाठी सर्वच विभागांचे स्टॉल येथे लावण्यात आले आहेत. यावेळी ज्यांची कामे रखडलेली होती, त्यांची कामे तत्काळ करून देण्यात आली. महसूल विभाग, वीज वितरण कंपनी, कृषी विभाग, पाटबंधारे विभागासह जनसामान्यांशी संबंधित सर्वच विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

ही संकल्पना राज्यभर राबविणार..

ही संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांची वर्षानुवर्षे अडकलेली शासकीय कामे तात्काळ होतील, असेही कडू म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT