Gondia Gond-Gowari : भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काल (ता. 28) रोजी गोंड-गोवारी समाजाच्या उपोषण स्थळाला भेट देऊन आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणाऱ्या आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक हक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या समस्या जाणून घेतल्या.
डॉ. फुके यांनी नुकतीच राज्याचे मुख्य सचिव आणि सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांची मुंबई मंत्रालयात भेट घेत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ढिवर (ढिमर) समाजाचे आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अलिकडेच काही दिवसांपूर्वी डॉ. फुके यांनी ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतला होता.
गोंड गोवारी जमातीच्या संस्कृती व परंपरेनुसार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, गोंड गोवारी जमातीच्या अर्जदारांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी 1950 पूर्वीच्या वर्णनात गोवारी/गोवारा/गवारी अशी कागदपत्रे असूनही "गोंड गोवारी" जमातीच्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज स्वीकारला जात नाही.
गोंड गोवारी यांच्या जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्राबाबत घटनात्मक व वैधानिक प्रणाली अंतर्गत माधुरी पाटिल विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांच्या विरुद्ध दिवाणी अपील 18 डिसेंबर 2020 आणि विशेष अनुज्ञा याचिका 1993, 94 मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गोंड गोवारी जमाती प्रमाण पत्र व जाती प्रमाण पत्र बाबत परिपत्रक निगर्मित करण्यात आले पाहिजे, असे डाॅ. फुके म्हणाले.
ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. गोंड गोवारी यांचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्रासोबतच घटनात्मक अधिकारांतर्गत मुलांना शिष्यवृत्ती, पदविका, पदवी मिळविण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी आमची मागणी आहे.
डॉ.परिणय फुके यांनी समाजाच्या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासह उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शासनाला न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन करणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डाॅ. परिणय फुके यांनी यासंदर्भात संबंधित विभागाचे सचिव आणि इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोब फोनवर बोलणे केले आहे. उद्या (ता. ३०) उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावीत यांच्यासह सचिव आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तेथे डाॅ. फुके गोंड-गोवारी समाजाचा विषय लावून धरणार आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.