Narendra Bhondekar News Sarkarnama
विदर्भ

Bhandara News : आमदार भोंडेकरांची वाढली जबाबदारी ; जखमी गोविंदांना द्यावी लागणार शासकीय नोकरी

Narendra Bhondekar News : दहीहंडी बांधलेला स्तंभ कोसळल्यामुळे अनेक गोविंदा जखमी झाले होते.

अभिजीत घोरमारे

DahiHandi News : आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांच्या वतीने दहीहंडीच्या कार्यक्रमाचे भव्यदिव्य असे आयोजन दसरा मैदान येथे रविवारी करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागले. दहीहंडी फोडताना बांधलेल्या दोराला लटकल्याने दोर बांधलेला एक लाकडी स्तंभ अचानक कोसळला ही घटना रविवारी रात्री घडली होती. त्यामध्ये अनेक गोविंदा जखमी झाले होते.

या मध्ये अभिषेक हसराज देशमुख यांच्या पायाला फ्रॅक्चर असून प्रजत बांगरे, यशवंत हलमारे, हेमंत मडावी, शिवम परतेकी, गुरू सिरसाम, आयुष झंझाड, रोहित हलमारे, अभय देशमुख, बबलू मडावी, आयुष वैद्य अशी जखमींचा नावे आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दहीहंडी कार्यक्रमात जे गोविंदा जखमी आणि फ्रॅक्चर झालेत त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे या सर्व जखमी गोविंदाना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची जबाबदारी आता आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर आली आहे.

भोंडेकर यांच्या वतीने रविवारी विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लाखोंची बक्षिसे ठेवले होते. दहीहंडी फोडून झाल्यानंतर या दोन्ही विजयी पथकांच्या गोविंदांनी एकत्र येत पुन्हा दहीहंडीच्या दोरखंडापर्यंत पोहचण्यासाठी थरावर थर लावले. कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी या उत्साहावर पाणी फिरले. दहीहंडी बांधण्यासाठी लावण्यात आलेला एक लाकडी स्तंभ कोसळून पडला. यात अनेक गोविंदा जखमी झाले. या सर्व जखमी गोविंदांना ताबडतोब सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे योग्य सुविधा नसल्याचे कारण पुढे करीत सर्वांना भोंडेकर यांच्या पेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

फ्रॅक्चर झालेल्या गोंविंदाला दुसऱ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष, म्हणजे ही सर्व दृश्य भंडाराकर लाइव बघत होते. त्यामुळे या अपघातानंतर भंडाराकरांचा तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. दहीहांडी भरविता मात्र गोविंदांची सुरक्षितता वाऱ्यावर का सोडता ! असा सवाल विचारला जात आहे. दूसरी कडे नागरिकांकडून जखमी गोविंदा पथकाची आस्थेने विचारपूस होत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी जे गोविंदा दहीहंडी दरम्यान जखमी आणि फ्रॅक्चर होतील त्यांना शासकीय नौकरित सामावून घेण्याची घोषणा केली होती. त्या घोषनेत आता या जखमी गोविंदाला सामावून घेण्याचे काम भोंडेकर यांना करावे लागणार आहे. भोंडेकर हे पूर्वाश्रमिचे शिवसैनिक आहेत. ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. यापूर्वी अनेक योजना प्रकल्प त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना मागणी करून आणल्या आहेत.

मुख्यमंत्री सुद्धा भोंडेकर यांच्या मागणी वर भंडारा (Bhandara) जिल्ह्यात येतात. त्या मुळे सर्व जखमी गोविंदाला शासकीय नौकरी मिळवून देणे आमदार भोंडेकर यांना अडचणीचे नाही. तश्या अपेक्षा आता जखमी गोविंदा आणि त्यांच्या पालकांनी भोंडेकर यांच्याकडून लावून धरल्या आहेत. त्यामुळे आमदार भोंडेकर यांना जखमी गोंविदाना शासकीय नौकरी द्यावी लागणार आहे. ही जबाबदारी भोंडेकर यांना पार पाडावी लागणार आहे. अन्यथा विरोधक हा मुद्दा निवडणुकी दरम्यान लावून धरू शकतात यात शंका नाही हेही तितकेच खरे आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT