Yavatmal Sarkarnama
विदर्भ

ग्रामपंचायत निवडणूक : कॉंग्रेसमध्ये ‘भारत जोडो’चा उत्साह; शिंदे-ठाकरे गटांची अग्निपरीक्षा

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील शिंदे तसेच ठाकरे गटाचा कस लागणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत (Shivsena) दोन गट झाले आहे.

चेतन देशमुख

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील शिंदे तसेच ठाकरे गटाचा कस लागणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत (Shivsena) दोन गट झाले आहे. सदस्य नोंदणीपासून तर निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटांची लढाई सुरू आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला असून निवडणुका ताब्यात घेण्याची त्याची तयारी असून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपनेही कंबर कसली आहे.

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) व राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. निवडणूक विभागाने केलेली प्रभागरचना व आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. चौथ्या टप्प्यात १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. १८ नोव्हेंबरला तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली.

२८ नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत इच्छुकांना निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सत्तात्तरानंतर राजकीय समीकरण बदलल्याने जिल्ह्यातही त्यांचे पडसाद उमटताना दिसत आहे. पालकमंत्रिपद शिंदे गटाकडे असून ठाकरे गटाकडून शेतकरी प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे-ठाकरे गटांत संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निवडणुकीवर फोकस केला आहे.

सर्वपक्षीयांकडून जोरदार तयारी..

ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासंदर्भात आयोगाने आदेश जारी केले आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेची लिटमस्ट टेस्ट मानली जात आहे. यापूर्वी झालेल्या ७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने चांगले प्रदर्शन केले आहे. या निवडणुका जिंकून मिनी मंत्रालयावर आपली सत्ता स्थापन करण्याची तयारी सर्वच पक्षांकडून केली जाणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायती..

आर्णी तालुक्यात सात, बाभूळगाव एक, दारव्हा आठ, दिग्रस पाच, घाटंजी सहा, मारेगाव नऊ, नेर एक, पुसद १२, राळेगाव आठ, उमरखेड चार, वणी १९, यवतमाळ १६, झरी जामणी या तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT