Chandrakant khaire and Hansaraj Ahir Sarkarnama
विदर्भ

Hansaraj Ahir : ...तर मी चंद्रकांत खैरेंना भेटलोच नसतो, असं का म्हणाले अहीर?

सरकारनामा ब्यूरो

Hansaraj Ahir on Chandrakant Khaire's Accusation : लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवाला भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर हंसराज अहीर यांच्या पराभवाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जबाबदार आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी परवा केला होता. या आरोपावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात काल रात्री माध्यमांना पाठवलेल्या संदेशात अहीर म्हणतात, ‘चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत होऊ शकत नाही. आमच्या पक्षात भांडणे लावण्याचा त्यांचा मानस आहे. जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत त्यांच्या या वक्तव्याला मी महत्व देणार नाही. त्यांचे हे वक्तव्य माझ्या भेटीच्या एक दिवस पूर्वीचे होते याची मला कल्पना असती तर मी भेट टाळली असती.’

मी चंद्रकांत खैरे यांना भेटलो होतो. त्याच्या एक दिवसापूर्वी खैरेंनी उपरोक्त आरोप केला होता आणि त्याची माहिती मला नव्हती. मला हे जर आधी माहिती असते, तर मी खैरेंची भेट टाळली असती. त्यांच्या आरोपाने आमच्या पक्षात संभ्रमाचे वातावरण तयार होण्याची शक्यता होती,

गैरसमज निर्माण होण्याची शक्यता होती. पण भाजपमध्ये शिस्तीला मोठे महत्व आहे आणि आम्ही नेत्यांनी खैरेंच्या (Chandrakant Khaire) त्या वक्तव्यानंतर सामंजस्याची भूमिका घेतली. त्यामुळे कुठलाही वाद झाला नाही. पण खैरेंचा प्रयत्न आमच्या पक्षात वाद निर्माण करण्याचा होता, असेही अहीर म्हणाले.

काय म्हणाले होते खैरे ?

लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवाला भाजपचे (BJP) तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) तर हंसराज अहीर यांच्या पराभवाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) जबाबदार आहेत. राज्यात भाजपने पैशाच्या बळावर फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. यांचे गंभीर परिणाम भविष्यात भाजपला भोगावे लागतील.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मराठी माणसाला न्याय देण्याचे काम केले. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला. तेव्हा भाजपने अंग झटकले होते. त्यानंतर त्याची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली. त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT