Hardeep Singh Puri and Others Sarkarnama
विदर्भ

Hardeep Singh Puri : आगाऊ पैसे द्यावे लागले असतील, तर त्या अधिकाऱ्याचे नाव सांगा !

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal News : पाचशे वर्षांपासून ज्या क्षणाची हिंदूबांधव आणि रामभक्त वाट पाहत होते. तो दिवस 22 जानेवारीला उजाडला. अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा झाली. तो क्षण सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले. संकल्प यात्रेनिमित्त ते आज (ता. २३) यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आले होते.

या कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. दरम्यान, ते मंचावरून उठले आणि थेट लोकांमध्ये जाऊन बसले. लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. ‘योजनेचा लाभ तुम्हाला सहज मिळाला का की, काही त्रास झाला. योजनेचा लाभ घेताना तुम्हाला कुण्या अधिकाऱ्याने तुम्हाला आगाऊ पैसे मागितले का? असे असेल तर त्या अधिकाऱ्याचे नाव सांगा. त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. मी येथून गेल्यावरही तुम्हाला काही सांगायचे असल्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगा. आपण कारवाई नक्कीच करू,’ असे त्यांना लाभार्थ्यांना सांगितले.

संकल्पयात्रेनिमित्त वणी येथील एसबी लॉनमध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपूर-आर्णी लोकसभा विस्तारक रवी बेलूरकर, विजय चोरडिया आदींची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.

याशिवाय त्यांच्या हस्ते उज्ज्वला गॅस सिलिंडरचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. संबोधित करताना हरदीपसिंग पुरी यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मोठी झेप घेतली आहे. प्रत्येक योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. असे असले तरी या योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर प्रभू श्रीराम मंदिराची निर्मिती आणि श्रीरामांची प्रतिष्ठापना ही देशातला एकात्मभाव जोडणारा धागा आहे. त्यामुळेच हा क्षण इतिहासातील सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, यात दुमत नसल्याचे स्पष्ट केले.

रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा देशातीलच नव्हे, तर परदेशातील नागरिकांनी याचि डोळा याचि देही अनुभवला. अनेकांना रामलल्लाच्या मर्यादेचा यावेळी साक्षात्कार झाला. तीच मर्यादा जीवन जगताना आपणही पाळली पाहिजे. शिस्तीतून प्रत्येकाने आयुष्य घडविले पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मुद्रा लोन, आवास योजनेचे कोट्यवधी लाभार्थी...

प्रत्येकाचा विकास व्हावा, या उदात्त हेतूने केंद्र शासन काम करीत आहे. नव्हे तर आजवर केंद्रातील कुठल्याही सत्तेने गोरगरिबांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी एवढे मोठे कार्य केलेले नाही. मुद्रा लोन आणि केंद्रीय आवास योजनेचे आज देशभर कोट्यवधी लाभार्थी आहेत. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची मोठी उपलब्धी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापुढेही मोदी नेतृत्वातील सरकार गरिबांच्या विकासासाठी असेच प्रयत्नशील राहील, असे सांगत केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांवरही शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना पोहोचविण्याची मोठी जबाबदारी असल्याचेही स्पष्ट केले.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT