Hema Malini Sarkarnama
विदर्भ

Loksabha Election 2024 : भाजपाने लोकसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानंतर हेमामालिनींची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Hema Malini News : चंद्रपूर येथे मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या संकल्पनेतून सुरू असणाऱ्या ताडोबा महोत्सवात लावली हजेरी

संदीप रायपूरे

Chandrapur BJP News : भाजपाने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश दिसून आला, त्याचप्रमाणे अनेकांची नावेही आली नाहीत. त्याचप्रमाणे भाजपाच्या मथुरा लोकसभा मतदारसंघाचे तब्बल दोनदा नेतृत्व करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे.

तर पक्षाने विश्वास दाखविला त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. यावेळी मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली तर पूर्ण ताकदिनिशी आपण ती पार पाडणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ताडोबा महोत्सव सुरू आहे. रविवारी या महोत्सवाचा समारोप होत आहे. यात हेमामालिनी यांचे गंगावर आधारित नृत्य होणार असल्याने त्या चंद्रपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू आहे. यामध्ये श्रेया घोषाल, कुमार विश्वास यांच्यासह विदेशातील अनेक कलावंतानी आपआपल्या कला सादर केल्या. त्यानंतर आज हेमामालिनी यांचे नृत्य होणार आहे.

चंद्रपुरात आगमन होताच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मथुरा लोकसभा मतदारसंघातून आपण दोनदा विजय मिळविला. आता तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली. मथुरावासीयांचं आपल्यावर असलेल्या प्रेमाने ही कामगिरी करता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणावर जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय 'गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने विकासाचे मोठे काम केले. महिलांच्या हितासाठी त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले. याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत 400 हून अधिक जागा जिंकू.' आसा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच मथुरा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण तत्पर आहोत. येणाऱ्या दिवसांत मथुरा येथे कृष्णाचे भव्यदिव्य मंदिर बांधण्याचा आमचा मानस आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी समन्वय साधून मथुरा येथे 14 हजार कोटी रूपयांचे रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळवून दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या संस्कृतीत नद्यांना पवित्र असे स्थान आहे. या नद्यांच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला यश मिळत आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.

तीस वर्षापूर्वी आपण चंद्रपूरात आले होते. तेव्हाचे चंद्रपूर अन् आत्ताचे चंद्रपूर यात मोठा फरक आढळून आला.चंद्रपूरच्या विकासात राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत त्यांच्याकडे विकासाचे जबरदस्त व्हिजन आहे, असे गौरोद्दार यावेळी हेमामालिनी यांनी काढले.

सांस्कृतिक मंत्री व्हायला आवडेल.... -

आपण तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहोत.यावेळी आपणाला मंत्रिपदाची संधी आहे का असा प्रश्न विचारला असता, हेमामालिनी यांनी लोकसभा,राज्यसभा याबाबत सुरुवातीला काहीच माहिती नव्हती. आपण ती शिकून घेतली. आता जर पक्ष मंत्रिपदाची संधी देईल तर ही जबाबदारी आपण ताकदीने पार पाडू असेही त्या म्हणाल्या. सुधीर मुनगंटीवार राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत. माझे हेच क्षेत्र असल्याने मला हाच विभाग जास्त जवळचा असल्याचे त्या म्हणाल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT