hemant patil krupal tumane bhavan gawali eknath shinde sarkarnama
विदर्भ

Hemant Patil : सीएम शिंदेंनी शब्द पाळला; गवळी,तुमानेनंतर हेमंत पाटलांचंही जोरदार 'कमबॅक'; थेट मंत्रिपदाचंच 'गिफ्ट'

CM Eknath Shinde Shivsena Political News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकी खेचून आणलेल्या हेमंत पाटलांना 2024 मध्ये महायुतीतील शिवसेनेकडून पुन्हा तिकीट देण्यात आलं होतं. पण,काही दिवसांतच पाटलांचा 'पत्ता' कट करून हदगावचे बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारीची लॉटरी लागली होती.

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंसोबत 'घरोबा' केलेल्या निम्म्याहून जास्त विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला होता. या खासदारांचं तिकीट कापण्यामागे भाजपचा सर्व्हे असल्याचं सांगण्यात आलं होतं. या सर्व्हेत संबंधित खासदार निवडून येणार नसल्याचं दाखवण्यात आलं होतं. यात विदर्भातील हेमंत पाटील, भावना गवळी, कृपाल तुमाने यांचाही समावेश होता.

मुख्यमंत्री शिंदेंनी गवळी आणि तुमाने यांना विधान परिषदेवर घेत संधी देत त्यांचं पुनर्वसन केलं.यानंतर हेमंत पाटलांचं (Hemant Patil) काय असा सवाल त्यांच्या समर्थकांकडून विचारण्यात येत होता. पण दिलेला शब्द पूर्ण करणारच या मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.

माजी खासदार हेमंत पाटलांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. माजी पाटील यांना आता राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची माहिती सोमवारी (ता.16) समोर आले आहे. हेमंत पाटील हे हिंगोलीचे शिंदे गटाचे माजी खासदार आहे.

त्यांचं लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची घोषणा होऊन परत तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांनी हिंगोलीमधून यंदाही उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली होती. पण ऐनवेळी तिकीट कापल्यामुळे पाटलांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी भावना गवळींच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) तिकीट कापलेल्या खासदारांना पुन्हा संधी देऊ. त्यांना रिकामं ठेवणार नाही,असा शब्द दिला होता.त्यानुसार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर घेत संधी मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला. पण, हेमंत पाटील यांचं काय? त्यांना कधी संधी मिळणार? अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.पण राजकीय पुनर्वसन करण्यात आल्यामुळे हिंगोलीसह राज्याच्या राजकारणात पुन्हा हेमंत पाटलांचं राजकीय वजन वाढणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकी खेचून आणलेल्या हेमंत पाटलांना 2024 मध्ये महायुतीतील शिवसेनेकडून पुन्हा तिकीट देण्यात आलं होतं.पण,काही दिवसांतच पाटलांचा 'पत्ता' कट करून हदगावचे बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारीची लॉटरी लागली होती.पण त्यांचा शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी पराभूत केले होते.पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.त्यांच्यासाठी हदगाव अथवा नांदेड दक्षिण या दोन मतदारसंघाची चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT