MLA Krishna Khopde, Harshwardhan Sapkal Sarkarnama
विदर्भ

BJP vs Congress : नागपुरात हिंदूंची घरे जाळली तेव्हा कुठे होता? भाजप आमदार खोपडेंचा काँग्रेसला सवाल

Nagpur BJP vs Congress Clash : काँग्रेसच्या सदभावना यात्रेमुळे आता नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शा‍ब्दिक दंगल सुरू झाली आहे. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीस भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले, त्यांच्यावर आरोपही केले.

Rajesh Charpe

Nagpur News, 17 Apr : काँग्रेसच्या सदभावना यात्रेमुळे आता नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शा‍ब्दिक दंगल सुरू झाली आहे. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीस भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले, त्यांच्यावर आरोपही केले.

त्यामुळे चिडलेल्या भाजपच्या (BJP) आमदारांनी प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी हिंदूची घरे जाळली याची चिंता काँग्रेसला नाही तर फक्त मुस्लिमांची गमावलेल्या व्होट बँकेसाठी सर्व धडपड सुरू असल्याची टीका केली आहे.

औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपूरमध्ये महिनाभरापूर्वी दंगल उसळली होती. यामुळे निर्माण झालेल्या दोन धर्मातील वादावर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्यावतीने बुधवारी सद्‍भावना यात्रा काढण्यात आली होती.

यात्रेच्या समारोपीय कार्यकर्मार सपकाळ यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी भाजपवर तिखट शब्दात टीका केली. यावर आमदार खोपडे यांनी सद्‍भावना यात्रेला नौटंकी असे संबोधले. काँग्रेस सनातन धर्माचा अपमान करीत आहे. दंगा झाला त्या दिवशी काँग्रेसचा एक ही नेता भटकला नाही.

दंगेखोरांनी हिंदू लोकांची घरे जाळली, दगडफेक केली, घरात शिरून मारहाण केली. पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यावेळी हे काँग्रेसचे नेते कुंभकर्णी झोप घेत होते असा आरोप केला. काँग्रेसची त्यावेळी एकूणच भूमिका शंका निर्माण होती.

काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे व अकोला दंगलीत सामिल असलेला आरोपी साजिद पठाण यांच्या समितीने कसल्याही प्रकारचा दौरा न करता, एकही व्यक्तीच्या घरी न जाता दंगेखोरांच्या नातेवाइकांसोबत काही विशेष समुदायाच्या घरी गेले. मात्र ज्या हिंदू लोकांची घरे जाळली, ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या घरी मात्र एकही कॉंग्रेसचा नेता भटकला नाही.

काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी बसून रिपोर्ट तयार करण्यात आला. देशद्रोही हल्लेखोरांना क्लीन चीट देण्यात आली व हिंदू संघटनेला धारेवर धरून त्यांच्यावर कारवाईचा उल्लेख करून सनातन धर्माला बदनाम करण्याचा अहवाल राज्यपाल महोदयांकडे सादर करण्यात आला. काँग्रेसने हा रिपोर्ट सार्वजनिक करावा अशी मागणीही खोपडे यांनी केली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT