Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Twitter/@Tushar Gandhi
विदर्भ

Bharat Jodo यात्रेतील ऐतिहासिक क्षण: देश वाचवण्यासाठी गांधी-नेहरू उतरले रस्त्यावर...

सरकारनामा ब्युरो

Bharat Jodo Yatra बुलढाणा : भारत जोडो यात्रेने आज इतिहास रचला. महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा वारसा जपणारे महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतु राहुल गांधी हे दोघे आज भारत जोडो यात्रेत देश वाचवण्याच्या ऐतिहासिक कार्यात एकत्र सहभागी झाले.

देशाचे संविधान व लोकशाहीवर हुकुमशाही सरकार घाला घालत असले तरी आम्ही लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हातात हात घालून निघाले आहोत, असा संदेशच गांधी-नेहरू यांनी दिला. देशात जेव्हा इंग्रज सत्तेची हुकमशाही राजवट जुलुम व अत्याचार करत होती, तेव्हा जनतेचा आवाज बुलंद करत गांधी - नेहरू रस्त्यावर उतरले होते. स्वातंत्र्याच्या लढ्याचा जाज्वल्य इतिहास आज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लोकांनी पुन्हा अनुभवला. राहुल गांधी व तुषार गांधी भाजपाच्या हुकुमशाही राजवटीविरोधात जनतेचा आवाज बुलंद करत आज रस्त्यावर उतरल्याचे संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले.

एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा द्वेष, हिंसा, दहशत, अन्याय , अत्याचार डोके वर काढील तेव्हा तेव्हा बंधुभाव, अहिंसा, न्याय कायम राखण्यासाठी प्रत्येक युगात गांधी-नेहरू अवरतील आणि फक्त हिंदुस्थानलाच नाही तर संपूर्ण जगाला दिशा दाखवतील.

खिलते रहेंगे फूल चमन में,

अहिंसा-न्याय-भाईचारे के।

क्योंकि आते रहेंगे चमन में,

गांधी-नेहरू इसी बहाने से।।

या कवितेच्या ओळीतून जणू त्यांनी पुन्हा एकदा प्रेमाचा, अहिंसेचा संदेश दिला.

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलेच पेटलं आहे. राज्यभरात भाजप आणि मनसे आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. यावर तुषार गांधी यांनीदेखील आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले तुषार गांधी ?

मला वाटतं पुरोगामी लोकांनी त्यांचे ध्येय ओळखून या यात्रेत सहभागी होणंं फार गरजेचं आहे. गेल्या खुप दिवसांपासून भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची इच्छा होती. अकोल्यातून भारत जोडो यात्रा जाणार असल्याचं कळले. त्यातच अकोला माझे जन्मस्थळ असल्यामुळे अकोल्यातूनच या यात्रेत सहभागी होण्याचा विचार केला.

राहुल गांधी यांचं वक्तव्य अगदी योग्य आहे. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी जे सत्य आहे ते सत्यच मांडलं. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफीही मागितली होती. त्यांच्याकडून पेन्शनही घेतली होती. त्यात न सांगण्यासारखं काही नाही, सत्य सांगायला घाबरलो तर आपण सत्याशीही दगाबाजी करत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT