गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) गावखेड्यांतील निवडणुका म्हणजे लईच भारी. नगरपंचायत निवडणुकांत स्थिती वेगळी नाही. इथे स्वतः निवडून येणार कि नाही, यावर स्वतः उमेदवाराचा शेवटपर्यत भरोसा नसतो. पण आज गोंडपिपरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत कमालच झाली. निवडणुकीचा निकाल जाहिर झाला, अन् नवरा बायको दोघांनीची बाजी मारली. निकाल जाहीर होताच समर्थकांनी प्रचंड जल्लोष करित आंनदोत्सव साजरा केला. नवरा बायकोच्या विजयाने गोंडपिपरीत प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आपले खाते उघडले.
गोंडपिपरी नगरपंचतीच्या सतरा प्रभागांच्या निवडणुकीचे (Election) निकाल आज जाहिर करण्यात आले. सकाळी १० वाजतापासून निकालाला सूरवात झाली. प्रभाग क्रमांच ५मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेद्रसिंह चंदेल यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करित असतानाच प्रभाग क्रमांक ६चा निकाल जाहिर झाला. अन यात महेंद्रसिंह चंदेल यांची पत्नी सविता चंदेल या बहूमताने निवडून आल्याचे स्पष्ट झाले. दोन टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकीत नवरा बायको निवडून आल्याचे समजताच त्यांच्या समर्थर्कांनी प्रचंड जल्लोष केला.
21 डिसेंबर रोजी गोंडपिपरीत निवडणुका पार पडल्या. यात प्रभाग क्रमांक ५मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महेंदसिह चंदेल उभे होते. त्याच्यासमोर बलाढ्य राजकीय पक्षांचे आव्हान होते. दरम्यान या निवडणुका पार पडल्या. ओबीसी आरक्षण रद्द झाले, त्यामुळे तिन प्रभागाच्या निवडणुका लांबणीवर गेल्या. अन् तिन प्रभागांसाठीची निवडणूक १८ जानेवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादीचे महेद्रसिंह चंदेल यांच्या पत्नी सविता चंदेल या उभ्या होत्या. कॉंग्रेसच्या सारिका माडूरवार, भाजपच्या प्रांजली बोनगिरवार, शिवसेनेच्या गिता बैस या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या.
आज नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहिर करण्यात आले. प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महेद्रसिंह चंदेल निवडून आल्याची घोषणा झाली, अनं एकच जल्लोष झाला. यानंतर काही वेळातच प्रभाग क्रमांक ६ चा निकाल जाहिर झाला. अन सविता चंदेल यांच्या विजयाची घोषणा प्रशासनाने केली. नवऱ्यानंतर बायकोही निवडून आल्याचे समजताच याठिकाणी प्रचंड आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गोंडपिपरी नगरपंचायतीच्या आज आलेल्या निकालात कॉंग्रेसचे सात, भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन तर अपक्ष दोन उमेदवार विजयी झाले. बहूमत कुणाकडेच नसल्याने आता सत्ताप्राप्तीसाठी ‘सेटींग’ सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.