Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive : Facebook @Ravikant Tupkar
विदर्भ

Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive : मी तर कफल्लक माणूस; बायकोनेच घर सांभाळलं, तुपकरांनी सांगितली लव्हस्टोरी !

Ravikant Tupkar News : चळवळीतल्या माणसांच जगण खूप कठीण असतं.

सरकारनामा ब्यूरो

Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive : ''लग्न ठरलं त्याचवेळी आमच्या काही गोष्टी ठरल्या होत्या. आजपर्यंत तिने ती कमिटमेंट पाळली आहे.'' अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेनचे नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या पत्नीसाठी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षापासून संघटनेचं काम करताना येणाऱ्या अडचणी, राजकारण, चळवळी या सर्व गदारोळात आपण कुटूंबाला वेळ कसा देता यावर त्यांनी त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

''माझा आंतरजातीय प्रेम विवाह आहे. बायको माझ्यापेक्षा थोडी मोठी आहे. त्यामुळे ती अधिक समजदार आहे. ज्यावेळी आमचं लग्न ठरलं त्याचवेळी आमच्या काही गोष्टी ठरल्या होत्या. मी तिला सांगितलं होतं मी कफल्लक माणूस आहे. चळवळ माझा प्राण आहे. मी घरात एक रुपया आणू शकत नाही, संसार नावाची कन्सेप्ट माझ्या डोक्यात नाही.माझ्या डोक्यात भगतसिंहाचा विचार आहे. लोकांसाठी आयुष्य समर्पित करायंच. तिने मी संसार करेल, घर चालवेल, तु बिनधास्त लोकांसाठी काम कर. असं उत्तर दिलं. आजही तिने ती कमिटमेंट पाळली आहे. या परिस्थितीतही पूर्ण वेळ घर माझी मिसेसच चालवते. माझ्यावरील कार्यकर्त्यांवरील सर्व केसेसदेखील तीच बघते.'' असं रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितलं.

चळवळीतल्या माणसांच जगण खूप कठीण असतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुम्हाला मोठ व्हायचं असेल तर तुम्हाला यातना भोगाव्याच लागतील. एका बाजूला हा संघर्ष , दुसऱ्या बाजूल प्रस्थापितांचा संघर्ष, तिसरीकडे आपल्या आजूबाजूच्याच लोकांचा होणारा त्रास वेगळाच असतो. या सगळ्या प्रवासात माझी पत्नी शर्वरी हिने मला प्रचंड साथ दिली. आईवडील भाऊ-वहिनी, इतकचं काय माझ्या मुलांनीही मला यात साथ दिली. गेल्या १२-१३ वर्षात मी कधी पत्नी मुलांना फिरायलाही घेऊन गेलो नाही. असही तुपकर यांनी यावेळी सांगितलं. (Swabhimani shetkari Sanghatna)

तुम्हाला पुन्हा देवेंद्र फडणवीसांची ऑफर आहे का ? ''तुपकर म्हणाले, मुंबईत भेटले की सगळेजण बोलतच असतात, पण त्यांनाही माहिती आहे. या लोकांच्या विचारांची बैठक पक्की आहे. चळवळीतून प्रभावित झालेले आम्ही लोक आहोत. गेल्या वीस वर्षात आम्ही घरादाराचीही पर्वा केली नाही. जो पर्यंत आम्ही रात्री घरी जात नाही, तोपर्यंत आमची लेकरंबाळं झोपत नाहीत. भ्रष्टाचार न करत, एकही रुपया वेगळ्या मार्गाने न कमावता वीस वर्षे कार्यकर्ते टिकवून ठेवण, चळवळीच्या प्रवाहात राहणं हे साधं सोप काम नाही. ''

''आमदार खासदार मंत्री असाल तर तुमच्याकडे कार्यकर्ते टिकून राहतात. पण रविकांत तुपकर साधा ग्रामपंचायतीचा सदस्यही नसताना, माझ्या सर्व कुटूंबातील सदस्या आज या संकटाचा सामना करत आहे. या सर्वांच्या ताकदीवर हे उभं राहिलं आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही भूमिका समजून घेतली पाहिजे. हे माझं मत आहे.''

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT