MLA Ravi Rana news Updates 
विदर्भ

'मी फरार नाही, पोलीस बोलवतील तेव्हा यायला तयार'- रवी राणा

अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकीचे प्रकरणाने आमदार रवी राणा अडचणीत आले आहे.

सरकारनामा ब्युरो

अमरावती : अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकीचे प्रकरणाने आमदार रवी राणा अडचणीत आले आहे. रवी राणा यांच्यासह त्यांच्या 11 कार्यकर्त्यां विरुद्ध आयुक्तांवर प्राणघातक हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र रवी राणा हे अमरावतीत नसल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक राजधानी दिल्लीला रवाना झाले आहे. यात आमदार रवी राणा यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया देत रवी राणा हे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी अमरावतीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर अटकपूर्व जामिनसाठी अर्ज दाखल केला नाही पण तो पर्याय आमच्याकडे असल्याची माहिती अॅड. दीप मिश्रा यांनी दिली. तसेच कोर्टाने जामीन नाही दिला तर रवी राणा हे सरेंडर सुद्धा करू शकतात, असही वकीलांनी सांगितले.(MLA Ravi Rana news Updates)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अमरावतीमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी काही दिवसापूर्वी महापालिकेत केली होती, जिल्ह्यात महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Praveen Ashtikar) यांच्या अगांवर शाई फेकण्याचा प्रकार गेल्या बुधवारी (९ फेब्रुवारी) घडला.

या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर (Ravi Rana)गु्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा आणि अन्य 11 आरोपींवर कलम 307 नुसार हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी रवी राणा यांनी एका वृत्तवाहिनीला एक व्हिडीओ पाठवला. त्यात त्यांनी आपण अटक करुन घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

'मी फरार झालेलो नाही. पोलीस बोलावतील तेव्हा मी अमरावतीत यायला तयार आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना माझी अटकच हवी असेल, तर त्यांनी पोलिसांना दिल्लीला पाठवावे, मी अटक करवून घ्यायला तयार आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला. आपण दिल्लीतच आहोत, फरार नाही, असे सांगणारा व्हिडीओ आमदाक रवी राणा यांनी पाठवला आहे. आजही मी दिल्लीतच आहे.

माध्यमांमधून माझ्यावर ३०७ दाखल झाल्याचे कळल्यावर आपण दुसऱ्याच दिवशी मी दिल्लीत पत्रपरिषद घेतली. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी निर्दोष आहे. आजही दिल्ली येथे झालेल्या रेल्वेच्या बैठकीत सहभागी झालो. त्यामुळे पोलीस जेव्हा बोलावतील, तेव्हा मी अमरावतीत यायला तयार असल्याचे राणा यांनी व्हिडीओद्वारे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT