Nitin Gadkari and Yashomati Gadkari at Amravati. Sakarnama
विदर्भ

यशोमतीताई, टीव्हीएस आणि बजाजची एजन्सी मी मिळवून देतो...

नांदगाव पेठ मोर्शी हासुद्धा महत्वाचा रस्ता होता. अंजनगाव-परतवाडा-बैतुल या रस्त्याचेही काम पूर्ण झाले असल्याची माहिती नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी दिली.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : जगाचा पोशिंदा, अन्नदाता अशी शेतकऱ्यांची ओळख आहे. हाच शेतकरी आता ऊर्जादाता झाला पाहिजे, इथेनॉलची निर्मिती केली पाहिजे. कारण आता इथेनॉलवर चालणाऱ्या युरो ६ नॉर्म्सवरील गाड्या येत आहेत. दुचाकी गाड्यासुद्धा इथेनॉलवर आल्या आहेत. टीव्हीएस आणि बजाज या कंपन्या त्याची निर्मिती करतात. यशोमती ठाकूर यांना विनंती आहे की, त्यांनी इथेनॉलचे पंप जिल्ह्यात सुरू कराव. पाहिजे तर टिव्हिएस आणि बजाजची एजन्सी मी मिळवून देतो, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

अमरावती येथे विविध कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, इथेनॉल ६५ रुपये लीटर आहे तर, पेट्रोल ११५ रुपयांवर पोहोचले आहे. शेतकऱ्यांनी निर्मित केलेल्या इंधनावर गाड्या चालल्या पाहिजे, देशी इंधनावर गाड्या चालल्या पाहिजे, तेव्हा कुठे विदर्भातला शेतकरी समृद्ध होईल. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, वर्धेचे खासदार रामदास तडस, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, महापौर चेतन गावंडे, आमदार रामदास आंबटकर, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार रणजीत पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार रवी राणा, आमदार दादाराव केचे. आमदार बळवंत वानखेडे उपस्थित होते.

आज जवळपास २ हजार कोटी रुपयांची रस्त्यांची काम पूर्ण होत आहेत आणि ती अमरावती जिल्ह्यातीलच आहेत याच कार्यक्रमात त्याचे उद्घाटन झाले. कोविडच्या काळात कुठल्याही कामाचे उद्घाटन होण्याची सोय नव्हती. काटोल वरूड या रस्त्याचे आज उद्घाटन झाले. पण काटोलपासून नागपूरपर्यंत १२०० कोटी रुपयांचा चार पदरी कॉंक्रीट रस्ता आहे. त्याचेही भूमिपूजन आता लवकरच करणार आहे. त्यामुळे नागपूर - काटोल, काटोल - वरूड - मोर्शी, मोर्शी - अचलपूर आणि अचलपूर वरून पुढे अकोट आणि शेगावपर्यंत हा रस्ता होणार आहे. सोबत मोर्शी-वरूड आणि पांढुर्णा हा रस्ता महत्वाचा होता, नांदगाव पेठ मोर्शी हासुद्धा महत्वाचा रस्ता होता. अंजनगाव-परतवाडा-बैतुल या रस्त्याचेही काम पूर्ण झाले असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

मी अनेकवेळा तळेगावहून आष्टीला गेलो, तेव्हा तो रस्ता बराच खराब होता. खासदार रामदास तडस मला नेहमी त्या रस्त्याबाबत मला सांगायचे. आज तो रस्ता पूर्ण झाला आहे. पाचही कामांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ‘ब्रीज कम बंधारे’ बांधले गेले आहेत आणि पाणी अडवले गेले आहे. त्यामुळे अनेक गावांना पाणी मिळणार आहे. इकडच्या चार-पाच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत होत्या. आता सिंचनाच्या सोयी यामुळे वाढल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या यापुढे होणार नाहीत, असा विश्‍वास गडकरींनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT