Akash Fundkar on Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

फडणवीसांना हात लावला तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीलाही आग लावू...

अशा बोगस कामांना आम्ही भिणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) आणि देश देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पाठीशी आहे, असे आकाश फुंडकर (Akash Fundkar) म्हणाले.

संजय जाधव

बुलडाणा : राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीसला जाळून त्यांच्या कृतीचा आम्ही निषेध करत आहे. महाविकास आघाडी सरकारला आम्ही इशारा देतो की, आज आम्ही नोटीस जाळली जर का सरकारने फडणवीसांना हात लावला, तर आम्ही महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) करत आहेत. सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिले की, फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारचा भंडाफोड केला. हे कटकारस्थान आणि षड्यंत्र करणारे सरकार आहे. या सरकारचा कारस्थानी चेहरा जेव्हा सरकारसमोर आला, तेव्हा त्यांची मानसिकता ढासळली आणि त्यांनी स्वतः सायबर ॲक्ट आणि टेलिग्राफ ॲक्टनुसार बीकेसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तेथे त्यांना चौकशीसाठी बोलावले.

खरं प्रकरण म्हणजे ज्या बदल्यांच्या घोटाळ्यामध्ये पोलिसांचा समावेश आहे, त्याचे पुरावे फडणवीसांनी सर्वांसमोर आणले आहेत. सरकारने या घोटाळ्यांची आणि या घोटाळ्यामध्ये जे समाविष्ट आहेत, त्यांची चौकशी करायला पाहिजे होती. पण ज्यांनी घोटाळा बाहेर काढला आणि पुरावे मांडले, त्यांचीच चौकशी सरकारने सुरू केली आहे. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा बोगस कामांना आम्ही भिणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि देश देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे, असे आकाश फुंडकर म्हणाले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणावरून खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाने आक्रमक होऊन नोटिसची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकारला कडक इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT