Imtiaz Jaleel News : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेले छोटेमोठे पक्ष आता बाहेर पडू लागले आहेत. यात एमआयएमचाही समावेश आहे. आघाडीचे नेते प्रतिसादच देत नसल्याने एमआयएमने स्वबळावर निवडूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाच्या वतीने राज्यभर मेळावे घेण्यात येत असून 9 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्जाचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमआयएमच्या वतीने नागपूरमध्ये महिलांचा मेळावा घेण्यात आला. तत्पूर्वी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षातर्फे स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले. बसपाच्या नेत्या मायावती यांनी तयारी दर्शवल्यास एक मिनिटात आम्ही होकार देऊ, असे जलील यांनी सांगितले.
वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबतही चर्चा झाली होती. आंबेडकर यांच्यासोबत जायचे नाही, असा आम्ही निर्णय घेतला आहे. भाजपचा पराभव करायचा आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते आम्हाला विचारात घ्यायला तयार नाहीते, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
यापूर्वी आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर बोलणे बंद केले. यावरून त्यांना आता आमची गरज नाही असे दिसते. आम्ही ज्या मतदारसंघात एमआयएमची ताकद आहे त्याच जागेची मागणी केली होती. एमआयएम सोबत असणे महाविकास आघाडीच्या जास्त फायद्याचे आहे. आम्ही स्वबळावर लढलो तर महाविकास आघाडीच्याच उमेदवारांचे नुकसान अधिक आहे, असे सांगून जलील यांनी सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीत 12 खासदार आमच्या मतांवर निवडून आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत दोन दोन तास रांगेत उभे राहून मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले होते. निकालानंतर मुस्लिमांना आता आपल्याशिवाय दुसरा पर्याय नाही असा समज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही आमची ताकद आघाडीला दाखवणार आहोत. भाजपचा पराभव करण्याचा ठेका आम्ही एकट्याने उचलला नाही. ते आघाडीच्या नेत्यांना समाजयाला हवे असेही जलील म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणे आमची राजकीय मजबुरी होती. मुस्लिम समाजाच्या विरोधात कायम भूमिका घेणारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला जायचे नव्हते. दुसरीकडे भाजपचा पराभव करायचा होता. विधानसभेतही आमची हीच भूमिक आहे. मात्र आघाडीचे नेते प्रतिसादच देत नसल्याने स्वबळावर लढणे हा आमचा नाईलाज असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.