Bacchu Kadu, Neema Arora and MLA Nitin Deshmukh
Bacchu Kadu, Neema Arora and MLA Nitin Deshmukh Sarkarnama
विदर्भ

पालकमंत्री बच्चू कडूंसमोर सेना आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये जुंपली !

जयेश गावंडे

अकोला : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या चौधरी कोचिंग क्लासच्या वसीम चौधरीचा मुद्दा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या सभेत चांगलाच गाजला. शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आणि जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

या सभेत आमदार नितीन देशमुख आणि जिल्हाधिकारी वादात पालकमंत्री (Guardian Minister) बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मध्यस्थी केली. मोफत शिकवणीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने चौधरी कोचिंग क्लासच्या माध्यमातून राबविला होता. मात्र या एकाच क्लासला प्रशासनाने झुकते माप का दिले, अन्य क्लासलाही सहभागी का करून घेतले नाही, सरकारी यंत्रणेला वेठीस का धरण्यात आले असे प्रश्‍न करीत जिल्हाधिकारी (Collector) निमा अरोरा यांनी खुलासा करावा आणि नागरिकांना आवाहन करावे, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली. मात्र याला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नकार दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. बऱ्याच वेळ चर्चा झडल्यानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले.

काय आहे नेमकं प्रकरण?

मोफत शिकवणीचा उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून चौधरी कोचिंग क्लासच्या माध्यमातून राबविण्यात आणि याला ‘सुपर ७५’ या नावाने ओळखले जाऊ लागले. यासाठी चौधरींच्या कोचिंग क्लासकडे नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आले, असा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. दरम्यान याच क्लासेसच्या संचालक असलेल्या वसीम चौधरीवर अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वसीम चौधरी सध्या जेलची हवा खात आहे. दरम्यान आजच्या सभेत आमदार देशमुख म्हणाले. या क्लासबाबत प्रशासनाने आवाहन केल्याने लोकांनी नोंदणी केली. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौधरी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी जाऊ नये, असे आवाहन करावे, असे आमदार देशमुख म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार देशमुखांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आमदार देशमुख यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आमदार देशमुख यांनी थेट चौकशीचीच मागणी केली. यावरून जिल्हाधिकारी व आमदार देशमुख यांच्यात चांगलाच वाद झाला. जिल्हाधिकारी यांनीही करा माझी चौकशी असे म्हणाल्या. ही मग्रुरी असल्याची टीका आमदार देशमुख यांनी केली. तर आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी विधी मंडळात लक्षवेधी लावण्यात येईल, असे म्हटले, तर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT