नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सत्ता गमवावी लागली. त्यात सर्वाधिक नुकसान शिवसेनेचे झाले. त्यानंतर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार राऊत गुरुवार आणि शुक्रवार, असे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर होते. रवी भवनात त्यांनी सर्व बैठका घेतल्या. पण येथेही त्यांना गटबाजीला सामोरे जावे लागले.
शिवसेनेचे (Shivserna) राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यासमोरच शुक्रवारी रविवभवनात शिवसैनिकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर राऊत यांनी संपर्क प्रमुख आणि जिल्हाप्रमुखांनी केलेल्या स्थानिक स्तरावरच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात येणार असल्याचे सांगून सर्वांना शांत केले.
संजय राऊत दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर होते. काल त्यांनी रविभवन येथे बैठका बोलावल्या होत्या. यात संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कारभारावर सर्वांनी सडकून टीका करीत असंतोष व्यक्त केला. शिवसेनेचे शहर प्रमुख प्रवीण बरडे यांच्याकडून परस्पर पूर्व नागपूरची जबाबदारी काढत नितीन तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनीसुद्धा आपल्या अधिकारात विधानसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर केली, याचीही तक्रार चतुर्वेदी यांच्या गोटातून करण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. राऊत यांनी परस्पर करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याचे आश्वासन दिले. नवीन कार्यकारिणी ‘सामना’तून प्रसिद्ध केली जाईल आणि तीच खरी समजावी, असेही त्यांनी सांगितले.
तुमाने, इटकेलवार अनुपस्थित..
खासदार कृपाल तुमाने आणि जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार आजही बैठकीला उपस्थित नव्हते. तुमाने पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर गेले असल्याचे समजते. मात्र शहर व ग्रामीणच्या संपर्क प्रमुखांनी त्यांना बैठकीची माहिती दिली नसल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. असे असले तरी तुमाने आणि इटकेलवार यांचा बंडखोरांच्या यादीत समावेश झाला आहे.
कुमेरिया, बरडे शहराबाहेर..
जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया आणि शहर प्रमुख प्रवीण बरडे यांनी आपले म्हणणे मांडण्याची चांगली संधी गमावली. कुमेरिया मुंबईत तर बरडे पुण्यात आहेत. यामुळे त्यांच्या विरोधकांना तक्रार करण्याची आयती संधी मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.