नागपूर : जिल्हा परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी करून लढत आहे. परंतु ही निवडणूक राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसनेच जास्त प्रतिष्ठेची केली. विशेषकरून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यातील संपूर्ण मतदार संघ पिंजून काढले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारलासुद्धा ते गेले. पण राज्यातील राष्ट्रवादीचा एकही नेता इकडे भटकला नाही. त्यांनी ही निवडणूक वाऱ्यावर सोडल्याचे दिसते. त्यामुळे राष्ट्रवादीसुद्धा केदारांच्या छायेत असल्याचे चित्र तयार झाले.
भाजपचेही राज्य पातळीवरील नेते प्रचारासाठी आले नाही. त्यामुळे एकूणच ही निवडणूक वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी गांभीर्याने घेतली नसल्याची टीका कार्यकर्ते दबक्या आवाजात करीत आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक आली. ही निवडणूक कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करून लढली. कॉंग्रेसला एक हाती सत्ता मिळाली. त्यावेळी केदार यांनी मोठी मेहनत घेतली होती. संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढला होता. वरिष्ठ नेतेही त्यावेळी आले होते.
जिल्हा परिषदेत त्यांचेच वर्चस्व असून त्यांच्या नावावरच जिल्हा परिषद चालत असल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषदेवर त्यांचे संपूर्ण लक्ष असून अनेकदा त्यांनी बैठका घेतला. सर्वसाधारण सभेच्या दिवशीही ते सदस्यांची बैठक घेत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी जास्त प्रतिष्ठेची असल्याचे जाणवले. कॉंग्रेससोबत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्यांचीच राजकीय रसद पुरविली. त्यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचाही सहभाग होता. माजी मंत्री अनिल देशमुख नसल्याने पक्ष वाऱ्यावर गेल्याची चर्चा प्रचारादरम्यान रंगली होती.
वरिष्ठांकडून याची दखल घेतली असून वरिष्ठ नेते प्रचारासाठी येणार असल्याचे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले होते. परंतु एकही नेता आला नाही. त्यामुळे ही निवडणूक त्यांनी फारशी गांभीर्याने घेतली नसल्याचे कार्यकर्तेच बोलू लागले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेतेही प्रचारासाठी आले नाही. भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या साथीने स्थानिक पातळीवरील नेत्यांनी किल्ला लढविला. मागील निवडणुकीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरले होते. परंतु यावेळी ते ही दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा झडू लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.