Eknath Shinde News, Narendra Bhondekar News in Marathi
Eknath Shinde News, Narendra Bhondekar News in Marathi Sarkarnama
विदर्भ

जुन्या मैत्रीमुळे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर एकनाथ शिदेंसोबत गेले !

Abhijeet Ghormare

भंडारा : भंडारा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे सध्या आसाममधील गुवाहाटी येथे शिवसेनेचे बंडखोर बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गटात सामील असून ते एकनाथ शिंदे यांचे खास समर्थक मानले जातात. (Eknath Shinde News in Marathi)

आमदार भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मैत्री जुनीच असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. राजकीय विश्‍लेषकही याला दुजोरा देत आहेत. नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असले, तरी ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. विशेष म्हणजे भंडारा (Bhandara) जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून नरेंद्र भोंडेकर यांना विकासासाठी विशेष कामे मिळाली आहेत. या कामांच्या जोरावर भोंडेकर यांनी मतदारसंघात बरीच कामे केलेली आहेत. (Narendra Bhondekar News)

नगररचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघात दिलेल्या निधीतून भंडारा महिला रुग्णालय, भूमिगत गटार योजना आदी कामांचा श्रीगणेशा एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने भोंडेकर यांनी केला आणि त्यामुळेच या बंडामध्ये त्यांनी शिंदे यांची साथ दिली. शिंदे यांच्या राजकारणाची जी दिशा असेल, तीच नरेंद्र भोंडेकर यांच्या राजकारणाची दिशा असणार आहे, असे भोंडेकर यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री हे बंड पुकारले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळवारी आमदार भोंडेकर यांनी सूचक वक्तव्य केले. त्यानंतर दुपारी ते सुरत येथील ली मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाला जाऊन मिळाले. तेव्हापासून ते त्यांच्यासोबतच आहेत. आताही ते गुवाहाटी येथे हॉटेल रॅडिसन येथे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.

आता थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधणार आहेत. जनतेशी थेट संवाद साधून ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. हा संवाद झाल्यानंतर एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. नुकतेच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत कॅबिनेटच्या बैठकीतून बाहेर पडले. मुख्यमंत्री अत्यंत फ्रेश दिसले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर मुख्यमंत्री आता काय बोलणार हे तुम्हाला आणि आम्हालाही थोड्याच वेळात करणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT