Ishwar Balbudhe Sarkarnama
विदर्भ

NCP Ishwar Balbudhe : ईश्वर बाळबुधेंनी सोडली अजित पवारांची साथ; पुन्हा शरद पवारांसोबत करणार काम!

Rajesh Charpe

Ajit Pawar NCP News : विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुधे यांनी शरद पवारांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे ही एकप्रकारे त्यांची घरवापसी म्हणावी लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना बाळबुधे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. संपूर्ण राज्यभर त्यांनी यात्रा काढली होती. मागील विधानसभेच्या निवडणुकीत खासकरून ओबीसी आमदारांचा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचा मोठा वाटा होता. प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्यांनी प्रचार केला होता.

चार वर्षानंतर ओबीसी सेलची प्रदेश कार्यकारिणी बदलवण्यात आली होती. ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर नागपूर येथे ईश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले होते. यावेळी याशिबिराला शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी बाळबुधे यांच्या कार्याचा गौरव केला होता.

महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी महामंडळाच्या अध्यक्षपदी बाळबुधे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्तीचा आदेश सरकार अस्तित्वात असेपर्यंत निघाला नव्हता. नंतर अजित पवार शरद पवारांपासून वेगळे तेव्हा ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता साधरण वर्षभराच्या आतच त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.

'ओबीसी समाजासाठी अजित पवारांच्या(Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाच पुढाकार घेतला नाही. ओबीसी महामंडळावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही. एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे पक्षाचा कारभार सुरू असल्याचा आरोप करून बाळबुधे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन परत जाण्याचा निर्णय घेतला.

छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांची भेट घेऊन त्यांनी आपला निर्णय कळवला. शरद पवार यांनी सर्व ओबीसी कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. लवकरच एखादा कार्यक्रम घेऊन बाळबुधे व त्यांच्या समर्थकांचा जाहीर प्रवेश समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT