Sushma Andhare Sarkarnama
विदर्भ

Sushma Andhare : महिला मुख्यमंत्र्यांच्या रेस मध्ये नाही, हे केवळ कंड्या पिकवण्याचे काम…

MNS Prakash Mahajan : अंधारे म्हणाल्या, प्रकाश महाजन आपल्या पक्षाचे संस्कार दाखवतात.

Abhijit Ghormare_Guest

Udddhav Thackeray Group News : महाप्रबोधन यात्रेसाठी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे आज नागपुरात (Nagpur) आगमन झाले. नागपुरातून त्यांनी थेट गोंदिया गाठले. या यात्रेनिमित्त दोन दिवस त्या विदर्भात असणार आहेत. आज पूर्व विदर्भातील (Vidarbha) दिया तर उद्या भंडारा येथे त्यांच्या सभा होणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना भुंकायला ठेवले आहे, अशी टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली होती. त्यांच्या टीकेचा आज त्यांना खरपूस समाचार घेतला.

अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, प्रकाश महाजन आपल्या पक्षाचे संस्कार दाखवतात. पातळी सोडून बोलणे, याची शिकवण त्यांना असावी. तरीही मी त्यांचे आभार मानेन. कारण त्यांच्या पक्षनेतृत्वाच्या संस्कारांचा परिचय ते महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला करवून देत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री बनवण्याचा मानस बोलून दाखविला आहे. याबाबत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय क्रांतिकारक आहे. मी त्या रेसमध्ये नाही. कारण शिवसेना या परिवारातील मी शेंडेफळ आहे. माझ्यापेक्षाही ज्येष्ठ मंडळी पक्षात आहेत. त्यामुळे या विषयाशी माझा संबंधच येणार नाही. असे वक्तव्य करणे म्हणजे केवळ कंड्या पिकवण्याचे काम असल्याचे त्या म्हणाल्या.

भाऊ नरेंद्रला भेटायला आली आहे..

शिवसेना थकलेली नाही. तर नव्या उमेदीने लढणार आहे, हे दाखविण्यासाठी मी आलेली आहे आणि येथे तर मी माझा भाऊ नरेंद्र भोंडेकर यांच्या भेटीला आली आहे. अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी आमदार भोंडेकरांवर पलटवार करताना दिली. नरेंद्र भोंडेकर यांनी सुषमा अंधारे यांना भंडाऱ्यातून निवडणूक लढण्याचे आवाहन केले होते. त्याच्यावर पलटवार करताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेबद्दल विचारले असता आम्हीसुद्धा आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आलेलो आहोत.

शिवसेना थकलेली नाही नव्या उमेदीने लढणार आहे, हे दाखविण्यासाठी मी आलेली आहे, असे त्या म्हणाल्या. चार दोन आमदार हलले म्हणजे शिवसेना संपली, असे होत नाही. शिवसेनेने यापूर्वीही असे अनेक आघात झेलले आहेत. शिवसेनेचे मुख्य बेस हे त्यांचे मतदार आहेत, ते अजूनही शिवसेनेसोबत आहेत. त्यांना नवीन ताकद आणि उमेद देण्याकरिता ही यात्रा असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.

मी जे बोलतेय ते परफेक्ट ठिकाणी लागत असल्यामुळे टीका..

सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना फुटणार या मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या प्रकाश महाजनांनी पेढे वाटावे. महाजन कुटुंब पर्यायाने भाजप-शिवसेना संपविण्यासाठी करत असलेले प्रयत्नातून हे वाक्य असल्याचे बोलले. सुषमा अंधारेमुळे शिवसेना वाढणार आहे, याची भीती त्यांना असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे. मी जे बोलतेय ते परफेक्ट ठिकाणी जात असल्यामुळे माझ्यावर टीका होत आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT