Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Jalna Maratha Andolan : ...तर नेत्यांना फिरणे मुश्कील होईल; मराठा पोरांमध्ये जशास तसे उत्तर देण्याची धमक !

Ravikant Tupkar : हे आंदोलन हाताळण्यात सरकारला अपयश आलं आहे.

Atul Mehere

Jalna Maratha Movement News : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी काल (ता. १) पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचीही माहिती आहे. या घटनेचा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी तीव्र शब्दांत निषेध करत सरकारवर टीकास्त्र डागले आहे. (Ravikant Tupkar criticized the government in strong terms)

आंदोलकांच्या भावना सरकारने समजून घ्यायला हव्या. पण तसे न करता सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. हे आंदोलन हाताळण्यात सरकारला अपयश आलं आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे गैर नाही. त्यामुळे आंदोलकांची चर्चा करून मार्ग निघू शकतो. लाठीचार्ज करण्याची गरज नसते. पण सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचे तुपकर ट्विटमध्ये म्हणाले.

ट्विटमध्ये रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणतात, ‘मराठा आंदोलन सरकारने (Government) खूप संवेदनशीलपणे हाताळणे गरजेचे होते व आहे. आंदोलकांच्या भावना समजून घेणे खूप महत्वाचे आहे. परंतु जालन्यात अश्या पद्धतीने लाठीचार्ज करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हुकूमशाहीच..! कोणत्याही आंदोलनावर लाठीचार्ज करण्याची नवी पद्धत महाराष्ट्रात रूढ होत आहे का..?

आंदोलन करण्याचा, सत्याग्रह करण्याचा, न्याय मागण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला आहे. तो सरकारला हिरावून घेता येणार नाही. मराठा आरक्षण हा मराठा समाजाच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे यावर सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे व लाठीहल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे, हे शोधून दोषींवर तातडीने कारवाई करावी ..! मराठा समाजातील तरुण पोरं आक्रमक आहेत व जशास तसे उत्तर देण्याची त्यांच्यात धमक आहे, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तर नेत्यांना फिरणे मुश्कील होईल..!’

जालन्यात (Jalna) झालेल्या मराठा समाजावरील लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही वेळात धुळे - सोलापूर महामार्गावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आंदोलनादरम्यान, दगडफेक झाल्याने पोलिसही जखमी झालेले आहेत. या घटनेनंतर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणत विरोधकांनी या लाठीचार्जचा निषेध केला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT