jayant patil .jpg sarkarnama
विदर्भ

Jayant Patil : वळसे-पाटलांच्या सासरवाडीत जयंतराव अजितदादांना धक्का देणार! डहाकेंना तिकीट?

Jayant Patil Meet Dahake Family : जयंत पाटील यांनी थेट दिलीप वळसे-पाटील यांच्या सासरवाडीला भेट दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) जयंत पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. दिवंगत, माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सईताई डहाके कारंजा बाजार समितीच्या सभापती आहेत. सध्या त्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील हे डहाके कुटुंबियांचे जावई आहेत.

जयंत पाटील यांनी डहाके कुटुंबियांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यासह सभापती सईताई डहाके 'घड्याळ' सोडून 'तुतारी' हाती घेणार का? अशी चर्चा सुरू मतदारसंघात आहे. मात्र, भेटीमागाचं कारण जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

दिवंगत, माजी आमदार प्रकाश डहाके यांची जयंती असून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आलो होतो, असं जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

जयंत पाटील म्हणाले, "कारंजाची जागा आम्ही पूर्वीपासून लढत आलो आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीत ही जागा आम्ही लढलो. त्यामुळे शक्यतो कारंजा विधानसभा मतदारसंघातून आम्हीच लढू."

डहाके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देणार का? असा प्रश्न विचारल्यावर त्याबाबत आताच बोलणं योग्य नाही, असं जयंत पाटील सांगितलं आहे. पण, जयंत पाटील यांनी डहाके कुटुंबियांची भेट घेतल्यानं जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजेंद्र पाटणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके यांचा 22 हजार 724 मतांनी पराभव केला होता. प्रकाश डहाके यांना 50 हजार 841 मते मिळाली होती. तीन वर्षांपूर्वी प्रकाश डहाके यांचं निधन झालं.

पण, राष्ट्रवादीतील बंडानंतर डहाके यांच्या पत्नी, कारंजा बाजार समितीच्या सभापती सईताई डहाके यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत जाणं पसंत केलं. मात्र, जयंत पाटील यांनी डहाके कुटुंबियांच्या घरी भेट दिल्यानं कारंजा मतदारसंघात विधानसभेची गणिते बदलू शकतात, असं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT