Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
विदर्भ

जयंत पाटील हसत हसत म्हणाले, प्रॉब्लेम नाही; आमच्याकडे सर्वच जण येतात...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : आम्ही नाना पटोले, प्रफुल्ल पटेल यांच्या भेटी घेतल्या, पण दोघांनीही सांगितले की, दूध संघ तुमचे पैसे देऊ शकत नाही. यानंतर एका पंचायत समिती सदस्याने आपले नाव सांगताना ‘सुरेश दयाराम जंजाळ, पंचायत समिती सदस्य, भाजप’, असे सांगितले. त्यानंतर एकच हंशा पिकला. मग जयंत पाटलांनी हसत हसत ‘काही प्रॉब्लेम नाही, आमच्याकडे सर्वच जण येतात’ असे म्हटले. त्यानंतर पुन्हा हंशा पिकला.

दूध संघामध्ये दुधाला दर आणि पैसे भेटत नसल्याची तक्रार एका शेतकऱ्याने जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे केली. तसेच प्रफुल पटेल (Prafull Patel) यांना भेटलो मात्र पैसे अद्याप मिळाले नाहीत. नाना पटोलेंकडेही (Nana Patole) कैफियत मांडली. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आता तुम्ही लक्ष घाला, असे शेतकऱ्याने सांगितले. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांचे गाव आणि नाव विचारले असता. शेतकऱ्याने भंडारा जिल्ह्यातील असल्याचे सांगितले आणि शेतकऱ्याने नाव सांगत भाजपचा पंचायत समितीचा सदस्य असल्याचे सांगितले. यावेळी मात्र सर्वत्र हंशा पिकला. जयंत पाटील हसत म्हणाले की, आमच्या पक्षात सर्व जण येतात. आज सांगलीच्या इस्लामपूर मध्ये गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते.

पावसाळ्याची पूर्वतयारी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अधिकारी एकत्र बसून करत आहेत. जर काही गोष्टी अधिकारी स्तरावर मान्य होत असतील, तर पुढचे बरेच प्रश्न सुटण्यास मदत होईल. आगामी पावसाळ्याच्या तयारी बाबत बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. येणाऱ्या पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अधिकाऱ्यांची झूम वर एक बैठक घेण्यात आली आहे. जर काही गोष्टी अधिकारी स्तरावर मान्य होत असतील तर पुढचे बरेच प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT