Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama
विदर्भ

स्वातंत्र्य सैनिकानंतर कारगिल युद्धातील योद्धाही 'भारत जोडो यात्रे'त सहभागी

सरकारनांमा ब्यूरो

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो यात्रा' सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत कारगिल युद्धातील हिरो दीपचंद यांनी राहुल गांधींची भेट घेत ते पद यात्रेत सहभागी झाले. त्यांच्या या सहभागामुळे गांधींनी दीपचंद यांचे आभार देखील मानलेत.

''कारगिलच्या युद्धात भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. दीपचंद यांचा या युद्धात भारताच्या विजयासाठी महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या या स्पिरीटच्या माध्यमातून नक्कीच भारत जोडला जाईल'', असं म्हणत गांधींनी दीपचंद (Deepchand) यांच्याबाबत गौरवोद्गार काढले.

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) ही ७ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून निघाली होती. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र असा प्रवास करत ही यात्रा बुलढाण्यातील शेगावपर्यंत पोहोचली. भारताच्या विचार आणि संविधानाच्या रक्षणासाठी देशाचे रक्षक देखील मैदानात उतरलेत. कारगिल युद्धात शौर्य दाखवणारे हिरो दीपचंद हे आज भारत जोडो यात्रेत सहभागी झालेत, असं ट्वीट काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी केलंय.

दीपचंद हे हरियाणाचे रहिवासी आहेत. दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS) यांनी कारगिल योद्धा ही पदवी त्यांना दिली होती. दीपचंद हे पहिले सैनिक होते ज्यांनी ऑपरेशन विजयमध्ये पहिला गोळीबार केला होता.

दरम्यान, ऑपरेशन पराक्रमाच्या दरम्यान बॉम्बस्फोटाने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले होते. पण या सर्व अडथळ्यांना न जुमानता अपंग सैनिकांसाठी आजही फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT