Nagpur News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या दोन्ही राज्याच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा इशारा देत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला होता. यामुळे राज्यात संताप व्यक्त होत असतानाच आज नागपूरच्या विमानतळावर 'कर्नाटकी पोस्टर' झळकल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपूरमध्ये येणार होते. त्याआधीच विमानतळाच्या बाहेर 'कर्नाटकी पोस्टर' (karnataka Tourism Poster) झळकल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र काही वेळानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे 'कर्नाटकी पोस्टर' फाडले. या पोस्टरबाजीवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपुरात होते. नागपूरमधील विमानतळावर त्यांचे आगमन झाले. ते समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी जाणार होते. त्याआधी नागपूर विमानतळाबाहेरील रस्त्यांवर कर्नाटक सरकारचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर काही वेळाने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे 'कर्नाटकी पोस्टर' फाडले. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्या पोस्टर्समध्ये नेमकं काय लिहिलं होतं?
'चला कर्नाटक पाहू या', असा आशय लिहिलेलं पोस्टर्स नागपूर विमानतळाच्या बाहेर लावण्यात आले होते. तसेच कर्नाटकमधील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळाचे फोटो या पोस्टर्सवर लावण्यात आले होते. त्या बरोबरच कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई व कर्नाटकच्या पर्यटनमंत्र्याचे फोटो या पोस्टर्सवर लावण्यात आले होते. (karnataka Tourism Poster)
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गाची (Samruddhi Mahamarg) पाहणी केली. यावेळी नागपूरात येवूनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी'कर्नाटकी पोस्टर'बाबत बोलणं टाळलं. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर आगामी काळात नेमकं काय निष्पन्न होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.