Efforts are being made for expansion in Vidarbha : भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज नागपूरला येत आहेत. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तेलंगणा मॉडेलची माहिती देणार असून बीआरएसच्या पक्ष कार्यालयाचे देखील उद्घाटन करणार आहेत. (Telangana Chief Minister Chandrasekhar Rao is coming to Nagpur today)
बीआरएसच्या विस्तारासाठी चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाऊल टाकले आहे. नांदेड येथे पक्षाचा मोठा सोहळा घेतल्यानंतर विदर्भात विस्तारासाठी प्रयत्न केले जात आहे. याकरिता बीआरएसचे पक्ष कार्यालय उघडण्यात येत आहे. वर्धा रोडवरील साई मंदिराजवळ, रामकृष्णनगर येथे हे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.
दुपारी दीड वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून ते थेट सुरेश भट सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्याला विदर्भातील चार ते पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा दावा पक्षाच्या समन्वयकांनी केला आहे.
बीआरएस पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी गेल्या काही महिन्यांपासून अनेक नेत्यांच्या संपर्कात आहे. माजी आमदार आशिष देशमुख यांच्याही बोलणीही केली होती. मात्र ते भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे बीआरएसने फक्त समन्वयकांच्या नियुक्त्या करून पक्षातील प्रमुख पदांचे अद्याप वाटप केलेले नाही.
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका कायम ठेवली असून राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या धारणी पोर्टलच्या संरक्षणासाठी कृषी क्षेत्राने प्रयत्न करावे, असे राव यांचे मत आहे. अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये विरोधकांच्या आणि विशेषतः काँग्रेसच्या नापाक मनसुब्यांचे शेतकऱ्यांनी निरीक्षण करावे, असा हल्लाही त्यांनी यापूर्वी कॉंग्रेसवर चढवला आहे.
राज्यातील (Maharashtra) काही नेते धारणी पोर्टलच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत आणि बंगालच्या उपसागरात ‘धारणी‘ ला बुडवून टाकण्याची भाषा करीत असल्याचे ते म्हणाले. धारणी पोर्टलला बुडवणे म्हणजे शेतकऱ्यांना (Farmers) बुडवणे होय. आम्ही शेतकऱ्यांना बुडवण्याच्या या विरोधकांच्या खोडसाळ हेतूंना प्रोत्साहन देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) धारणी पोर्टलने शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीच्या नोंदींचे संक्षिप्तपणे संरक्षण करण्याचा लाभ कसा मिळवून दिला याची माहिती त्यांनी यापूर्वी दिली आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.