Lakhni-Sakoli APMC
Lakhni-Sakoli APMC Sarkarnama
विदर्भ

Lakhni-Sakoli APMC : भाजप-राष्ट्रवादीला प्रबळ दावेदारांतून साधावा लागणार सुवर्णमध्य !

सरकारनामा ब्यूरो

Bhandara District's Lakhni-Sakoli APMC Election News : राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसकडून सभापतिपदासाठी विनायक बुरडे, अविनाश ब्राम्हणकर, तर भाजपकडून सभापतिपदासाठी माजी सभापती शिवराम गिऱ्हेपुंजे व अजय तुमसरे यांची नावे चर्चेत आहेत. माजी पालकमंत्री परिणय फुके (भाजप) व भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे (राष्ट्रवादी) यांच्या नेतृत्वाखाली भाजप-राष्ट्रवादीच्या पॅनलने १८ पैकी १४ जागा जिंकून काँग्रेस समर्थीत पॅनलचा पराभव केला. (The BJP-Nationalist panel defeated the Congress-backed panel)

या बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी राष्ट्रवादीचे सात तर भाजपचे ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. निकालाअंती राष्ट्रवादीचे सात व भाजपचे ११ पैकी सात उमेदवार निवडून आले. येथे राष्ट्रवादीने शत प्रतिशत यश संपादन केले आहे. त्यामुळे सभापतिपद राष्ट्रवादीला मिळेल, असे तालुक्यातील राजकीय पंडितांचे मत आहे.

बाजार समितीचे माजी सभापती आणि भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे जवळपास तेरा वर्ष लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदावर विराजमान होते. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष पद मिळाले. पण त्यांच्या कार्यकाळात भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत पाहिजे तसे यश मिळविता आले नाही.

गावात प्रयोगशील शेती करणारे तसेच राजकीय वर्तुळ पूर्ण करून राजकारणासह सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले जिल्हा परिषदेचे चे माजी बांधकाम सभापती विनायक बुरडे विविध कार्यक्रमांना, तसेच निवडणुकीमध्येही सक्रिय आहेत. यामुळे त्यांना सभापतिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सभापतिपदासाठी दावेदार असणारे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य अविनाश ब्राम्हणकर यांनीही जि. प. निवडणुकीच्या वेळी भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर जि.प. सदस्यही झाले.

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावून पक्षाचे काम केले आहे. भाजपचे साकोली तालुक्यातील अजय तुमसरे हेसुद्धा सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. सभापतिपद त्यांना मिळाले नाही, तर उपसभापतिपदासाठी त्यांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. सभापतिपदासाठी लाखनी तालुक्यातून राष्ट्रवादीकडून विनायक बुरडे व भाजपकडून शिवराम गिऱ्हेपुंजे तर साकोली तालुक्यातून राष्ट्रवादीकडून अविनाश ब्राम्हणकर व भाजपकडून अजय तुमसरे यांची नावे चर्चिल्या जात आहेत. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी आघाडीचा फॉर्म्यूला काय ठरतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुरडेंबाबत राष्ट्रवादी भाजपची सावध भूमिका..

भविष्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका (Elections) आहेत. त्यामुळे विनायक बुरडे यांना न दुखवता किंवा पदाची संधी न देता समंजसपणा करून त्यांच्याशी संबंध ठेवून भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत डोकेदुखी नको म्हणून भाजप व राष्ट्रवादी जपून पाऊल टाकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना न दुखवता टप्प्याटप्प्याने भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत जपून पावले टाकत आपले नुकसान होणार नाही, याकडेही दोन्ही पक्ष जातीने लक्ष देत आहेत.

सभापतीच्या संधीकडे जिल्ह्याचे लक्ष..

लाखनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात लाखनी व साकोली या दोन तालुक्यांतील गावांचा समावेश होतो. या दोन्ही तालुक्यांतील कोणत्या संचालकाला सभापती होण्याची संधी मिळणार, याकडे जिल्ह्याचे (Bhandara) लक्ष लागले आहे. भाजपचे (BJP) दोन व राष्ट्रवादीचे (NCP) दोन यांपैकी कोणत्या संचालकांच्या नावाचा विचार होतो, हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी कळेल, अशी भाजप-राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT