Congress Leader Vijay Wadettiwar. Google
विदर्भ

Nagpur Maratha News : सरकार आणि जरांगेंचं काय ठरलं ते अधिवेशनात विचारू

Atul Mehere

Maharashtra Winter Assembly Session 2023 : मराठा आरक्षण देण्याबाबत आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांचं आपसांत काय गुपचूप ठरलंय हे सरकारला सांगावं लागेल. सरकारला मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसींच्या (OBC) मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षेनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.

उपराजधानी नागपूर येथे गुरुवारी (ता. 23) त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर वेगळा कायदा करून आरक्षण दिलं जाईल, असं आपलं आणि सरकारचं ठरल्याचा दावा मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील सांगत आहेत. (Leader Of Opposition Vijay Wadettiwar Says At Nagpur They Will Ask Government To Clarify There Stand on Maratha Reservation & OBC)

मनोज जरांगे काहीही सांगत असले तरी, यासंदर्भात सरकारला जाब द्यावा लागणार आहे. काय नेमकं ठरलंय ते आम्ही विचारणार आहोत. कधी ठरलं, कुठे ठरलं, कुणी ठरवलं या सर्व मुद्द्यांवर सरकारला बोलावच लागेल. सरकारला आम्ही नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बोलतं करू, असं वडेट्टीवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation) मुद्द्यावरून सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. दररोज नवीन विषयांवर वाद निर्माण होत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. मराठा आणि ओबीसी (Maratha & OBC) हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्नही होत असल्याचं बघायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष

राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या वेदना जाणवायला सरकारला वेळच नाही. सत्तेचा गैरफायदा घेण्यात सरकार व्यस्त आहे. राज्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी आम्ही करत होतो. पण एसडीआरएफ आणि एनडीआरएफची निकषांनुसार केंद्र सरकार मदत करते. त्या विभागाची बैठकसुद्धा मंत्र्यांनी घेतली नाही. केवळ तोंड पाहात 40 तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्यात आला. त्यानंतर घोषित झालेल्या एक हजार मंडळांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही. राज्य सरकारनं हात वर केले आहेत. या परिस्थितीत शेतकरी जगणार कसा, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ 36 टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे. आणखी सात महिने लोकांना काढायचे आहेत. राज्यात पिण्याचे पाणी नाही. शेती पिकत नाही. या स्थितीत शेतकऱ्यांवर किडनी विकायची वेळ आल्याचा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. राज्यात शेतकरी कर्जमुक्ती ही प्रमुख मागणी असल्याचे ते म्हणाले.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT