BJP leader Ashish Deshmukh addressing supporters during a local election campaign in Kalmeshwar. The political controversy highlights rising tensions during the local elections. Sarkarnama
विदर्भ

Ashish Deshmukh : 'हे फडणवीसांचं सरकार, गृहमंत्री नागपुरचा जास्त वळवळ केली तर तुला..., भरसभेतून भाजप आमदाराची विरोधकांना कापून काढण्याची धमकी

Ashish Deshmukh election campaign controversy : दोन दिवसांपूर्वी कळमेश्वरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप एका कार्यकर्त्यांला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर आरोप करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर बोलताना आशिष देशमुखांनी विरोधकांना धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे.

Jagdish Patil

Nagpur News, 28 Nov : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षातील नेते आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. यावेळी ते विरोधी उमेदवारांवर टोकाची टीका आणि आरोप करत आहेत.

हे आरोप करताना अनेक नेत्यांचा भाषेचा स्तर खालावत असल्याचंही दिसत आहे. काही ठिकाणी आम्हाला मत दिलं नाही तर निधी देणार नाही, अशा धमक्याही नेते आपल्या विरोधकांना दित आहेत. अशातच आता भाजप आमदार आशिष देशमुख यांनी तर थेट विरोधकांना कापून काढू अशी धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विरोधकांना उद्देशून ते यावेळी म्हणाले की, 'हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू, अशी उघड धमकी आशिष देशमुख यांनी दिली.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय नेत्यांनी बोलण्याच्या सर्वच मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आशिष देशमुखांनी हे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच केलं.

दरम्यान, नुकतंच दोन दिवसांपूर्वी कळमेश्वरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप एका कार्यकर्त्यांला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर आरोप करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर बोलताना आशिष देशमुखांनी विरोधकांना धमकी दिल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, लोकप्रतिनिधींना ही भाषा शोभते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये अशी आमची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजना कळमेश्वरमध्ये आणायच्या आहेत. दोन तारखेला प्रामाणिक आणि तुमच्यासाठी झटणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन आशिष देशमुख यांनी या प्रचार सभेतून केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT