Ramtek News : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. ग्रामीण भागातून पायी प्रचार रॅलींचा धडाका लावला आहे. जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क केला जात आहे. या पायी रॅली प्रामुख्याने बाजारपेठांमधूनन काढले जात आहेत. (Lok Sabah Election 2024)
रामटेकमधील मौदा तालुका हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा जुना विधानसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एकत्र मिळून प्रचार रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीत भाजपचे जिल्ह्याध्यक्ष सुधाकर कोहडे सहभागी झाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी माध्यमांशळी बोलताना भाजपचे (BJP) कोहडे म्हणाले, "एकदा केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला. आम्ही 400 पारच्या उद्देशाने निवडणूक प्रचारात उतरलो आहोत. पारवेंसारखा चांगला उमेदवार आम्हाला मिळाला आहे. आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. पारवे धनुष्यबाण घेऊन दिल्लीला पोहचणार यात कुठेही शंका नाही, असा विश्वास कोहडे यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.