Sharad Pawar | Prakash Ambedkar  sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : आंबेडकरांना महाविकास आघाडी झटका देणार की तारणार? पवारांची भूमिका ठरणार निर्णायक

सरकारनामा ब्युरो

अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्ष, असा तिंरगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत. तिरंगी लढतीचा फायदा नेहमी भाजपला होत असल्याचा इतिहास आहे. पण, त्यामुळे वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील ( Abhay Patil ) यांचे टेंन्शन वाढले आहे. या सर्व गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांना 'झटका देते की तारते' हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी काँग्रेससोबत बोलण्याचे संकेत दिल्याने काँग्रेसचा उमेदवार रिंगणात राहतो की नाही याबाबत कोडेच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे भाजपा उमेदवार अनुप धोत्रे ( Anup Dhore ) यांच्याविरोधात दस्तुरखुद्द भाजपाचेच माजी आमदार नारायणराव गव्हाणकर ( Narayanrao Gavhankar ) यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या या निर्णयाने भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला असून वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढण्यात व्यस्त आहेत.

काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील ( Abhay Patil ) यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. अनुप धोत्रे व डॉ. अभय पाटील हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी सोलापूर मतदार संघातून उमेदवारी दाखल केली होती. अकोला प्रकाश आंबेडकर यांचा परंपरागत लोकसभा मतदार संघ असून या मतदार संघातून त्यांनी दोनदा (1998 आणि 1999 ) लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे.

2019 मध्ये काय होता निकाल?

संजय धोत्रे : भाजप : 5 लाख 54 हजार 444 मते

प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडी : 2 लाख 78 हजार 848 मते

हिदायतुल्ला बरकतुल्लाह पटेल : काँग्रेस : 2 लाख 54 हजार 370 मते


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT