भाजपनं नवनीत राणा ( Navneet Rana ) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीतील पक्ष नाराज झाले आहेत. 'प्रहार'नं शिवसैनिक असलेल्या दिनेश बूब यांना अमरावतीतून राणांविरोधात उतरलं आहे. त्यातच नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करू, असा इशारा 'प्रहार' जनशक्तीचे नेते, बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी दिला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी प्रतिक्रिया देत बच्चू कडूंचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या कोर्टात टोलवला आहे.
बच्चू कडू काय म्हणाले?
"नवनीत राणा ( Navneet Rana ) भाजपत तर रवी राणा ( Ravi Rana ) कुठे आहेत? भाजपचा युवा स्वाभिमान पक्ष होऊ शकतो. तसेच, आता तीर सुटला असून तो मागे येणार नाही. निशाणा लागल्यावर तो तीर मागे येईल. दोन लाखांच्या मतांनी पराभूत करू, वेळ प्रसंगी नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करू," असा इशारा कडूंनी ( Bacchu Kadu ) दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कडूंच्या भूमिकेबद्दल अमरावतीत प्रसारमाध्यमांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला. त्यावर बावनकुळे ( Chandrashekh Bawankule ) म्हणाले, "कडूंचा वेगळा पक्ष असून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. कडू हे एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्याबरोबर युतीत आहेत. कडूंची थेट भाजपशी नाही तर शिंदेंबरोबर युती आहे. कडूंचा तिढा शिंदे सोडवतील. कडूंनी नाही ऐकलं, तर मतदार ठरवतील ते होईल."
अभिजजित अडसूळ यांनी दिनेश बूब यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बावनकुळेंनी म्हटलं, "अभिजित काहीही बोलले असले, तरी मी आनंदराव अडसूळांसह अमित शाह ( Amit Shah ) यांना भेटलो आहे. आनंदरावांचा सन्मान राखणं ही एकनाथ शिंदेंसह आमची सर्वांची जबाबदारी आहे. आनंदरावांची केंद्रीय आणि राज्यातील नेते उंची राखतील, हा मला विश्वास आहे. त्यामुळे अभिजित यांच्याबद्दल आनंदराव निर्णय घेतील."
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.