PM Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

PM Narendra Modi: मोदींकडून काँग्रेसला थेट 'कारल्या'ची उपमा; मराठी म्हणीचा दाखला देत म्हणाले...

Chandrapur Lok Sabha Election: भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज चंद्रपुरात पार पडली. तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात आले होते.

सरकारनामा ब्यूरो

PM Narendra Modi in Chandrapur: "कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच" या म्हणीचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमधील (Chandrapur) सभेतून काँग्रेसवर सडकून टीका केली. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात आलेल्या पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

सभेत मोदी (Narendra Modi) म्हणाले, चंद्रपुरात (Chandrapur) उन्हाचा पारा वाढत आहे, तसंच राजकीय वातावरणही तापतं आहे. मात्र तुमचा जोश आणि उत्साह अजिबात कमी झालेला नाही. चंद्रपूरने 'फिर एक बार 400 पार' ठरवलं असल्याचंही मोदी म्हणाले. शिवाय राम मंदिराच्या निर्मितीसाठी आणि संसदेच्या नव्या इमारतीसाठीही चंद्रपूरचं लाकूड वापरलं असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज चंद्रपुरात पार पडली. तब्बल 10 वर्षांनी मोदी आज चंद्रपुरात आले होते. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रामदार आठवले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या वेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मोदी म्हणाले, "देशात एका बाजूला भाजपप्रणित (BJP) एनडीएचं सरकार आहे, ज्यांना केवळ देशासाठी भक्कम निर्णय घ्यायचे आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि इंडी आघाडी आहे. ज्यांचा एकच मंत्र आहे. तो म्हणजे जिथे सत्ता मिळेल तिथली मलाई खाणे. इंडी आघाडीने देशाला नेहमीच अस्थिर ठेवलं आहे. मात्र, एक स्थिर सरकार किती गरजेचं असतं ते महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या कोणाला कळणार? असं म्हणत इंडी आघाडीचं केंद्रात सरकार असताना महाराष्ट्राची उपेक्षा झाली होती."

तर इंडी आगाडी जनादेश बाजूला ठेवून सत्तेत आली तेव्हा स्वतःचा विकास हाच त्यांचा मंत्र होता. मराठीत एक म्हण आहे, कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच राहते. काहीही केलं तरी त्याचा कडवटपणा जात नाही. ही म्हण काँग्रेसला तंतोतंत लागू होते. कारण ते कधीच सुधारणार नाहीत. आपल्या कर्तृत्वामुळेच काँग्रेसने जनमत घालवलं आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची भाषा दिसते.

इंडी आघाडीचा खासदार तुकडे करण्याची भाषा बोलतो स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष सनातन धर्मावर टीका करतो. सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराशी तुलना करत आहेत, तर काँग्रेस आणि नकली शिवसेनावाले त्यांना आणून रॅली काढताहेत. मात्र, जनता हे सगळं स्वीकारणार नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT