Amravati News : प्रहार क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपला वेगळा आणि स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे महायुतीचा भाग असलेले कडू यांनी शिंदे-फडणवसीसांना एकप्रकारे आव्हानच दिल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)
अमरावतीमधून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देणे हे बच्चू कडू यांना मान्य नाही. त्यामुळे कडू अमरावतीत राणांविरोधात वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. तर 6 एप्रिलला अमरावतीत प्रहारचा उमेदवार लोकसभेचा अर्ज भरणार, अशी माहिती समोर आलेली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले, "भाजपचाच (BJP) कार्यकर्ता आहे, तो पक्षाकडून डावलला गेला आहे. त्या डावलेल्या भाजप कार्यर्त्यालाच मी माझ्या पक्षाकडून उमेदवारी देणार आहे. एक ते दीड लाखांच्या मताधिक्याने आमचा उमेदवार निवडून येईल. इथे बौद्ध आणि दलित समाजाची ताकद आहे. त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यांनीसुद्धा आम्हाला बळ देण्याचे सांगितले आहे."
"मी याबाबत शिंदे - फडणवीसांशी बोललो नाही पण ही आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण येथून उमेदवार दिला पाहिजे. त्यामुळे प्रहारचा पहिला खासदार यावेळी निवडून आणता येईल. राणांवर येथील लोक नाराज आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारावरही लोक नाराज आहेत, असेही कडू (bacchu kadu) म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.