Yashomati Thakur, Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election News : आमचे पक्ष वेगळे असले तरी…! बच्चू कडूंसाठी ठाकूर आल्या धावून

Rajanand More

Amravati News :  अमरावतीतील सायन्स स्कोअर मैदानामध्ये प्रचारसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाला मिळालेली परवानगी पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी रद्द करण्यात आली आहे. (Lok Sabha Election News) त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले असून आज त्यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तसेच त्यांनी उद्या सभास्थळी आंदोलनाची हाक दिली आहे. पोलिसांच्या या भूमिकेविरोधात विरोधकही कडूंच्या समर्थनासाठी धावून आले आहेत.

बच्चू कडू (Bachchu kadu) यांना 24 एप्रिलच्या सभेसाठी परवानगी मिळाली होती. पण त्याचदिवशी भाजपकडून अमित शाह (Amit Shah) यांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कडूंच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्यावरून आज मोठा गोंधळ निर्माण झाला होता. (Amaravati Latest News)

प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने कडू यांना सभा घेता येणार नाही. प्रशासनाच्या या भूमिकेवर विरोधकांनीही टीका केली आहे. काँग्रेसच्या (Congress) नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी कडू यांचे नाव न घेता भाजपवर शरसंधान साधले आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकूर यांनी म्हटले आहे की, महायुतीतील एका पक्षाने अमरावतीतील सभेसाठी परवानगी घेतली होती. तयारी ही केली. मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी नसतानाही पोलीस बळाचा वापर करत मैदान रिकामं करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमरावतीची राजकीय संस्कृती महान आहे. आज पर्यंत या जिल्ह्यात कधीही अशी घटना झालेली नाही.

आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी भारताचं संविधान सर्वोच्च आहे. भारतीय संविधानाने सर्वांना निवडणूक लढण्याचा आणि प्रचार करण्याचा समान अधिकार दिलेला आहे. निवडणूक आयोग बघ्याची भूमिका घेत आहे, ही हुकूमशाहीची सुरूवात आहे. इतक्या वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेच्या काळात कधी अशा पद्धतीची दडपशाही केली गेली नाही, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

भाजपने देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू केलाय. याच साठी देशात काँग्रेसचं सरकार पाहिजे. ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आता या धनशक्तीला अमरावतीतील जनशक्ती हरवल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकूर म्हणाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT