changed rajeshree patil Bhavana Gawali  sarkarnama
विदर्भ

Yavatmal Washim Loksabha News : भावना गवळी यांचा पत्ता कट? राजश्री पाटील यांना उमेदवारी...

Roshan More

Yavatmal Washim Loksabha News : शिवसेनेवर (शिंदे गट) उमेदवार बदलण्याची नामुष्की आली आहे. हिंगोलीचे जाहीर केलेले उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलत बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर यवतमाळ-वाशीमधून मतदारसंघातून भावना गवळी यांच्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यामागे भाजप कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी यवतमाळ-वाशीममधून मतदारसंघातून भावना गवळी (Bhavana Gawali ) यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी कालच (मंगळवारी) भेट घेतली. हेमंत पाटील यांनीदेखील त्यांच्या उमेदवारी बदलण्याच्या चर्चा सुरू असताना शक्तिप्रदर्शन केले होते.

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले की, हेमंत पाटील यांच्याऐवजी जो उमेदवार देतील त्याचे काम आम्ही पक्ष आदेश म्हणून निश्चित करू. हेमंत पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशीममधून उमेदवारी देण्याची चर्चा होती.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT