Mahadev Jankar Sarkarnama
विदर्भ

Mahadev Jankar : महादेव जानकर अवघ्या 10 आमदारांवर 'रासप'चा मुख्यमंत्री करणार ; काय आहे प्लॅन?

Rashtriya Samaj Paksha : 'रासप'कडे अनेक रस्ते आहेत. एक भाजपचा तर दुसरा काँग्रेसचा, मात्र आपण...' असंही महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Mahadev Jankar on Vidhan Sabha Election : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्व पक्ष राज्यात आपली ताकद वाढवण्यासाठी रणनीती आखत आहेत. शिवाय, मेळावे, रॅली, बैठकांसह अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अद्याप जागा वाटप ठरलेलं नाही. तर मनसे, रासप हे पक्ष स्वबळावरच लढण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवणार असल्याचं विधान केलं आहे.

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत(vidhan Sabha Election) राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुती व महाविकास आघाडी सोबत समान अंतर ठेवून आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचा निर्णय घेण्यात येत असून कार्यकर्त्यांनी निवडणूकीसाठी जोमाने तयारी सुरू करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेवराव जानकर यांनी केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा 21 वा वर्धापन दिन सोहळा अकोला येथील मराठा मंगल कार्यालयात गुरुवारी पार पडला, यावेळी ते बोलत होते.

यात राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरणार,राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमामा,राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील पाल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथनाना शेवते, रत्नाकर गुट्टे, पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ तैसीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

दीप प्रजवलन व स्वागत गीताने या संमेलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी पारंपरिक तुतारी वाजवून जानकर यांचे तर सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

जानकर(Mahadev Jankar ) यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय समाज पक्षाच्या 20 वर्षांच्या कार्याचा आढावा सादर केला. ते म्हणाले, 'रासप कडे अनेक रस्ते आहेत, एक भाजपचा, तर दुसरा काँग्रेसचा रस्ता आहे. मात्र आपण स्वतः पांदण तयार करून त्या पांदणाद्वारे मार्गक्रमण या राजकीय व्यवस्थेत करीत असल्याचे स्पष्ट केले. रासप हा गोरगरिब, कष्टकरी,कामगिरी ,शेतकरी आदींचा पक्ष असून या 20 वर्षात पक्षाने अनेक गडांतर जवळून बघितले आहेत. समर्पित कार्यकर्त्यांचा तापून निघालेला हा पक्ष असून हा नव्या जोमाने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले.

तथापि रासपची शक्ती ही मर्यादित असूनही आपण जिंकणाऱ्यांना पाडू शकतो याचे भान अन्य पक्षांनी ठेवावे, असा सूचना वजा इशारा ही जानकर यांनी यावेळी दिला. या विधानसभेत कुठल्याच पक्षाला बढत मिळणार नसली तरी कार्यकर्त्यांनी जर राष्ट्रीय समाज पक्षाचे दहा उमेदवार निवडून दिलेत तर राज्याच्या राजकीय व्यवस्थेत नवे मन्वंतर घडून येणारा मुख्यमंत्री हा रासपचा होऊन शकतो असे स्पष्ट केले. आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी अन्य पक्षाच्या नादी न लागता आपल्या पक्षाला वाढविण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक युवा आघाडीचे अध्यक्ष केशव मुळे यांनी केले.या सोहळ्याचे प्रास्तविक पक्षाचे अकोला युवक अध्यक्ष केशव मुळे यांनी करून पक्षाची रूपरेखा मांडली. संचालन पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर तर आभार रासप जिल्हाध्यक्ष दादाराव ढगे यांनी मानले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT