Chandrashekhar Bawankule sarkarnama
विदर्भ

Congress Candidate List : चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला!

Chandrashekhar Bawankule Suresh Bhoyar Kamthi constituency : भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षाला उमेदवारी जाहीर केली आहे.

Rajesh Charpe

Congress Candidate List : भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात कामठी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भोयर हे मूळचे भाजपचे आहेत. बावनकुळे यांनीच त्यांना आपले आपल्या रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवरून निवडून आणले होते. या अर्थाने ते बावनकुळे यांचे राजकीय क्षेत्रातील शिष्य होतात. आता आत गुरु शिष्यांमध्ये कामठीत मुकाबला होणार आहे.

सुरेश भोयर यांचा 2019च्या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला होता. भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी ११ हजार मतांनी त्यांना पराभूत केले होते. बावनकुळे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना आमदार झाले होते. या रिक्त झालेल्या जागी त्यांनी सुरेश भोयर यांना आपले उत्तराधिकारी केले होते. याच पोटनिवडणुकीतून भोयर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

त्यानंतर भोयर पुन्हा जिल्हा परिषदेत भाजपकडून निवडून आले. मात्र या दरम्यान अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा आणि भोयर यांच्याशी घरोबा आहे. याशिवाय काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले होते. या करिता त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघात बांधणी सुरू केली होती.

नागपूर जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहावी या करिता भाजपचे सदस्य फोडण्याचे ठरले होते. या दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधाचा दाखला देऊन भोयर यांना गळाला लावले आणि काँग्रेसमध्ये आणून अध्यक्ष केले. त्यावेळी भाजपच्या अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी भोयर यांना साथ दिली. तेव्हापासून भोयर काँग्रेसवासी झाले.

हे सर्व ऑपरेशन करणारे अशोक चव्हाण आता भाजपात आहेत. नागपूर जिल्ह्याचे राजकारण बघून भोयर यांनी माजी मंत्री सुनील केदार यांचा हात पकडला आहे. मागील निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यामुळे कामठी मतदारसंघात मोठा असंतोष होता. भोयर यांना जिंकण्याची चांगली संधी चालून आली होती. मात्र बावनकुळे यांच्या विकासकामंची पुण्याईने सावरकर यांना तारले. भोयर यांना विजय नोंदवण्यासाठी पाचसहा हजार मते अपुरी पडली. आता त्यांना बावनकुळे यांच्यासोबतच थेट लढावे लागणार आहे.

(Edited by Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT