Assembly Election Sarkarnama
विदर्भ

Assembly Election Result : नागपूर जिल्ह्यात घड्याळाची टिकटिक अन् तुतारीचा आवाज बंद, मशालही विझली!

Nagpur District NCP NCP SP Shiv Sena Uddhav Thackeray : नागपूर जिल्ह्यात शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही.  

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात फक्त कमळ आणि पंजा आणि रामटेकमध्ये धनुष्यबाणाला सर्वाधिक मतदान झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी तुतारीला हद्दपार केले आणि मशालीला पेटच घेऊ दिला नाही.

नागपूर जिल्ह्यात शरद पवारांची घड्याळाची टिकटिक राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुमारे पंधरा वर्षे सुरू ठेवली होती. मात्र यावेळी त्यांनी तुतारी हाती घेतली. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांची तुतारी भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनी काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात वाजूच दिली नाही.

नागपूर शहरात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी हट्टाने उमेदवारी खेचून आणली. पंधरा वर्ष राज्यात आघाडीची सत्ता असतानाही काँग्रेसने एकही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली नव्हती. यावेळी फारशी अनुकूल परिस्थिती नसतानाही तुतारीला पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ सोडण्यात आला. हा धक्का काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पचनी पडला नाही. तुतारीचे पेठे यांना 50 हजार मतांचाही आकडा गाठता आला नाही. भाजपचे कृष्णा खोपडे विक्रीम मतांनी निवडूण आले.

हिंगणा मतदारसंघात रमेश बंग यांना हाती तुतारी घेण्याचे धाडस अंगलट आले. भाजपच्या समीर मेघे यांनी सुमारे साठ हजारांच्या मताधिक्यांनी तुतारीचे आव्हान मोडून काढले. सावनेरमध्ये आशिष देशमुख, कामठीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या हाताला उंचावूच दिले नाही. रामटेकमध्ये आशिष जयस्वाल यांनी मात्र आपला धनुष्यबाण कायम राखण्यात यश मिळाले. त्यांनी बॅट आणि मशालीचे आव्हान धुडकावून लावले.

शिवसेना एकसंध असताना जयस्वाल यांनीच सुमारे पंधरा वर्षे धनुष्यबाणाला नागपूर जिल्ह्यात जिवंत ठेवले होते. आता शिंदे सेनेत जाऊन त्यांनी धनुष्यबाणावरची पकड आणखी मजबूत केली. येथून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने विशाल बरबटे यांच्या हाती मशाल सोपवली होती. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

पश्चिम आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात विकास ठाकरे आणि नितीन राऊत यांनी शहराला काँग्रेसमुक्त होऊ दिले नाही. उमरेड विधानसभा मतदारसंघात कमळ फुलेल अशी अपेक्षा होती. मात्र संजय मेश्राम यांच्या पंजाने कमळाला खुरडून काढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT