Udhav Thackeray ,Eknath Shinde
Udhav Thackeray ,Eknath Shinde sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray : विधीमंडळात महत्त्वाचा मुद्दा सुरु असताना मुख्यमंत्री दिल्लीला का गेले ?

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Assembly Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सीमावादाचा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. (Maharashtra Assembly Winter Session 2022 news update)

विधानपरिषदेत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सीमावादाबाबतच्या माहितीचा एक पेन ड्राईव्ह सादर केला. ठाकरेंनी शिवसेनेची सीमावादाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली येथे गेले आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. "आज विधिमंडळात सीमावादाचा महत्त्वाचा मुद्दा मांडला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना दिल्लीत जाण्याची गरज काय होती,? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

"आज मुख्यमंत्री म्हणत आहे की सीमावादावरून आम्ही लाठ्या खाल्ल्या आहेत. तुम्ही काय आम्हाला सांगता ? मात्र, आजही सीमावादावरून लाठ्याच खायच्या का?, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.सीमाप्रश्नावर निकाल लागत नाही, तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र भागाला केंद्र शासित प्रदेश करावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

शिंदे गटाच्या आमदारांनी आजही ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंना टार्गेट केले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केले. रविवारी ठाकरे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या बदनामीच्या पाठीमागे युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हेच असल्याचा गंभीर आरोप केला.

"माझ्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम व पाकिस्तानशी संबंध आहे. या महिलेला आदित्य ठाकरे यांचीच फूस आहे," असा आरोप शेवाळे यांनी केला आहे. या मुद्द्यावरून आज शिंदे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करीत आहेत.तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ आज ठाकरे गटाचे विधिमंडळात शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडाही वादळी ठरण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. विधानसभेत अद्यापही सीमावादाचा ठराव का मांडला नाही?, असा प्रश्न अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

SCROLL FOR NEXT