Nana Patole on Census. Sarkarnama
विदर्भ

Patole on Reservation : हिंमत असेल तर जातनिहाय जनगणना करून आरक्षण द्या!

Atul Mehere

Nagpur News : राज्य व केंद्र सरकार मराठा आरक्षण देऊ, असं सांगत वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळात हे दोन्ही सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळतेय. वेळ मारून नेण्यासाठी आश्वासनं देण्यात आली आहेत. परंतु वास्तविकतेत सरकार मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटविण्याचं काम करतेय, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला.

नागपूर येथे बुधवारी (ता. २२) पटोले म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार मुद्दाम संघर्ष होईल असे चित्र निर्माण करीत आहे. हा प्रकार थांबवायचा असेल आणि हिंमत असेल तर केंद्र सरकानं तातडीने राष्ट्रीयस्तरावर जातनिहाय जनगणना करावी व त्यानुसार आरक्षण द्यावे. (Maharashtra State Congress President Nana Patole Demands Cast Basis Census at Nagpur For Maratha Reservation & Also for Other Casts)

राज्य सरकार मराठा आरक्षण या विषयावर केवळ गप्पा करतेय. सरकार जातींमधील तेढ वाढवित आहे. शेतकऱ्याचा विषयावर नेते गप्प आहेत. मराठा आरक्षण देताना मुस्लिम समाजातील मागासवर्गीय जातीलाही सर्वेक्षण करून आरक्षण दिलं पाहिजे. देशात व राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी आधीच दिलंय. त्यामुळं सर्व जाती-धर्मांना न्याय हवा असेल तर त्यांना काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असं पटोले म्हणाले.

राज्यात एकापाठोपाठ आरक्षणाचे प्रश्न समोर येत आहेत. धनगर समाजाने आरक्षणाची मागणी केलीय. त्यामुळं वातावरण तापत आहे. या परिस्थितीत राष्ट्रीयस्तरावर जातनिहाय जनगणना करणं गरजेचं झालंय. केंद्रानं ते करावं. भाजपमध्ये दम असेल तर जातनिहाय जनगणना करून मग आरक्षण द्यावं, असं आव्हान पटोले यांनी दिलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कंत्राटी भरती बंद केलीय. परंतु ती सुरूच आहे. कायमस्वरूपी नोकर भरतीवर तर अघोषित बंदीच घालण्यात आलीय. त्यामुळं राज्यातील तरुणांची वयोमर्यादा निघून गेल्यानंतर त्यांना सरकारी नोकरीवर ठेवणार आहात का, असा सवालही त्यांनी केला. मुळात हे सरकारच असंवैधानिक आहे असं नमूद करीत पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी

वेळेत निर्णय घेणं गरजेचं होतं. सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षावर ताशेरे ओढावे लागले. महाराष्ट्राच्या विधिमंडळ व्यवस्थेला कलंक लावण्याचा काम झालं आहे. ते पावित्र्य कायम राहावं असं आम्हाला आजही वाटतं. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा घडविणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘इंडिया’ आघाडीची पुढील बैठक 12 डिसेंबरला होणार आहे. पाच राज्यांतील निवडणूक संपली की, त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. सध्या जागावाटप, उमेदवार आदींबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. भाजपला कधीच कोणताही विरोधक नकोय. त्यामुळं संतापाच्या भरात त्यांनी हेरॉल्डवर कारवाईचा सपाटा लावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना कमी होत चालेल्या गर्दीमुळं भाजपची पीछेहाट होतेय, हे त्यांना दिसतंय. त्याचा राग ते हेरॉल्डसारख्या कारवाईतून काढत आहे, असं पटोलेंनी सांगितलं. धाड टाकल्यानंतर काहीच मिळणार नाही. लवकरच सत्य समोर येईल.

अकोला येथून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संविधान सन्मान महासभेचं नियमंत्रण पाठवल्याचं कळलय. प्रदेश कार्यालयाला अद्याप याबाबत माहिती नाही. वंचितने हे निमंत्रण पत्र परस्पर राहुल यांना पाठवलय. त्यामुळं यासंदर्भात अधिक भाष्य करणं पटोलेंनी टाळलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकात यांचे भाषण पोकळ होतं, असं ते म्हणाले. तुकाराम महाराजांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबांना भेटायला गेल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली. लोकच नसल्याने मुख्यमंत्र्यांनी भंडाऱ्यात ऐनवेळी रोड-शो रद्द केल्याचं पटोले म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोटोबाबत सरकारने विशेषत: गृहविभागने तपास करायला हवा. भाजपने संजय राऊतांच्या आरोपाचे पुराव्यासह खंडन केले पाहिजे, अशी मागणी पटोलेंनी केली. राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान केलेला पनौती शब्दाचा आणि कुणाचाही संबंध नाही. पानौतीमुळं भारतीय संघ क्रिकेट सामना हरला असा उल्लेख त्यांनी केला. त्यात आगपाखड करण्यासारखं काही नाही. उलट खेळाडूंच्या नावानं राजकारण करणं चुकीचं आहे, असं पटोले म्हणाले.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT