BJP MLA Sameer Meghe Sarkarnama
विदर्भ

Sameer Meghe : फडणवीस, पटोले, वडेट्टीवार, बावनकुळेंना मागे टाकून भाजपचे 'हे' उमेदवार ठरले नंबर वन; संपत्तीत 102 कोटींनी वाढ

Hingna Assembly constituency: मेघे यांनी २०१९ मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या संपत्तीचे विवरण दिले होते. त्यानुसार त्यांच्या परिवाराकडे १५९ कोटी ५९ लाखांची संपत्ती होती. मेघे यांनी उत्पन्नाचे माध्यम व्यवसाय दाखवले आहे.

Mangesh Mahale

Hingna Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दिलेली संपत्तीची माहिती लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. भाजप उमेदवार समीर मेघे हे विदर्भातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. निवडणुक प्रतिज्ञापत्रानुसार समीर मेघे यांच्याकडे एकूण 261 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

ते हिंगणा विधानसभा मतदारसंघातून लढत आहे. पाच वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीत 102 कोटींनी वाढली आहे. मेघे यांनी २०१९ मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या संपत्तीचे विवरण दिले होते. त्यानुसार त्यांच्या परिवाराकडे १५९ कोटी ५९ लाखांची संपत्ती होती. मेघे यांनी उत्पन्नाचे माध्यम व्यवसाय दाखवले आहे.

दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसमधून निलंबित आणि पश्चिम नागपुरातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले नरेंद्र जिचकार यांच्याकडे 157.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 13.27 कोटींची संपत्ती आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे 94.54 कोटी रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे 5.28 कोटींची संपत्ती तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 48.55 कोटींची संपत्ती असल्याचे निवडणुक प्रतिज्ञापत्रावरुन दिसते.

मेघे यांची २०१९ मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता धरून संपत्ती १५९ कोटींची होती. त्यात वाढ होऊन २००४ मध्ये २६१ कोटी झाली. २०१४ मध्ये समीर मेघे हे भाजपकडून हिंगणा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर २०१९ मध्येही ते निवडूण आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत. माजी खासदार दत्ता मेघे यांचे ते पुत्र आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT