Maharashtra Legislative Assembly Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Woman Chief Minister : महाराष्ट्रात होऊ शकते महिला मुख्यमंत्री, ‘या’ कॉंग्रेस नेत्याचे भाकीत !

Nagpur : विदर्भातील एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने हे भाकीत वर्तविले आहे.

Atul Mehere

Nagpur Political News : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून महिलेने मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे, यासंदर्भात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपले नेते खासदार शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत, तर भाजपच्या एका गटात पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. (A senior Congress leader from Vidarbha has predicted this)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

अशा स्थितीत नागपुरातील एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री नक्कीच होऊ शकते, असे भाकीत वर्तविले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी महिला नेत्याची निवड होऊ शकते काय, या प्रश्नावर उत्तर देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे भाकीत वर्तविले. देशाला पहिली महिला पंतप्रधान, पहिली महिला राष्ट्रपती काँग्रेसनेच दिली.

काँग्रेसच्या या नीतीचा आता बाकीचे पक्ष अवलंब करीत आहेत. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होणे, ही काही फार अवघड बाब नाही. अशी निवडदेखील शक्य आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. महिला मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका सकारात्मकच आहे. अर्थात याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो अंतिम असेल, असे वडेट्टीवार यांनी आवर्जून सांगितले.

राजकारणामध्ये महिलाही तितक्याच सक्षमपणे काम करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून महिला नेता तितक्याच ताकदीने काम करण्यात यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांचा आदर केला आहे. देशातील अनेक मोठ्या पदांपर्यंत पोहोचलेल्या महिला या काँग्रेसचीच देण आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रपती राजवटीचा डाव...

‘इंडिया’ आघाडीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सध्या धास्तावली आहे. त्यामुळे एक देश, एक निवडणूक यासारखे एखादे कारण पुढे करून निवडणूक पुढे ढकलण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप वडे‌ट्टीवार यांनी केला. देशभरात झालेल्या सर्वेक्षणातून राहुल गांधी यांचा पाठिंबा वाढत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

किमान दोन वर्षांसाठी निवडणूक होऊ नये, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मात्र, सरकारचे हे प्रयत्न हाणून पाडण्यात येतील, असेही ते म्हणाले. यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनीही राहुल गांधी यांना पाठिंबा वाढत असून, देशात काँग्रेसची लहर असल्याचा दावा केलेला आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT