Market Committee Election :
Market Committee Election : Sarkarnama
विदर्भ

Market Committee Election : वर्धा, सेलू , देवळी बाजार समितीवर महाविकास आघाडीचा गुलाल; भाजपच्या दिग्गजांना धक्का!

सरकारनामा ब्यूरो

Market Committee Election : आज राज्यभरातील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. तर काही बाजार समित्यांचाही (Bazar Samiti) निकाल आजच हाती आले आहे. विदर्भातील वर्धा, सेलू व देवळी या बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. या ठिकाणी भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. (Wardha District News)

सहकार नेते म्हणून परिचित असलेले सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने वर्चस्व राखले आहे. सुरेश देशमुख यांचे पुत्र डॉ. संदीप देशमुख यांनी पहिला विजय खेचून आणला. वर्धा बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १० जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. इतर जागांवर ही आघाडीचे उमेदवार आघाडी घेत आहेत.

सेलू बाजार समितीच्या निवडणुकीच १८ पैकी तब्बल १५ जागांवर आघाडीचे उमेदवारांनी विजय संपादन केल आहे. या निवडणुकीत सुरेश देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे व शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देवतारे यांच्या तिघाडीच्या शक्तीने मिळून महाविकास आघाडीचा विजय खेचून आणला आहे.

देवळीत बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीने कमाल केली आहे. या ठिकाणी आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण अठरा जागांपैकी सोळा जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. उर्वरीत दोन जागा आघाडीने या आधीच बिनविरोध जिंकल्या आहेत.

या तीन ही ठिकाणी भाजप खासदार रामदास तडस, (Ramdas Tadas) त्याचप्रमाणे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी निवडणूक जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र या ठिकाणी भाजपचा मतदारांनी पराभव घडवून आणला तर, महाविकास आघाडीला विजयी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT