Nana Patole, Ashok thorat, Jayant Patil, JItendra Awhad, Varsha Gaikwad, Balasaheb Thorat and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Mahavikas Meeting : वंचितसह महाविकासच्या बैठकीत ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चाच नाही !

Sachin Deshpande

Mahavikas Meeting : आज महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सहभाग नोंदविला. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत कळीचा मुद्दा ‘सीट शेअरींग’ होता. पण, त्यावर या बैठकीत चर्चा झाली नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. लोकसभेचे कुठले मतदारसंघ सोडण्यात येतील याचीदेखील चर्चा या बैठकीत झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) यांच्यावतीने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि उपाध्यक्ष डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांची आंबेडकरांसोबत उपस्थिती होती. वंचितसोबत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत एका हॉटेल मध्ये संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत पहिल्यांदाच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे या बैठकीत स्वागत केले. शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची या बैठकीत उपस्थिती होती. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितने आज सहभाग नोंदविला असला तरी ते अद्याप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे घटक झाले नसल्याचे आंबेडकरांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

आज वंचितने मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभाग नोंदविला असला तरी ते अद्यापपर्यंत आंबेडकरांनी ते महाविकास आघाडीचे घटक झाल्याचे मान्य केले नाही. त्यामुळे आंबेडकरांच्या मनात काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. वंचितची अमरावती येथील यशस्वी जाहीर सभा आणि त्यानंतर राज्यात वंचित असलेला दबादबा राजकीय वर्तुळात मानला जात आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला वंचितचा बसलेला फटका यंदा बसू नये, अशी काय ती काँग्रेसची रणनीती असल्याची माहिती समोर आली आहे. वंचितने राज्यात बारा लोकसभा जागांची मागणी केली होती. पण, या बैठकीत त्यावर चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. वंचितने किमान समान कार्यक्रम समोर करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना बैठकीत कोंडीत पकडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आधी कॉमन मिनिमम प्रोग्राम निश्चित करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच बरोबर मराठा आरक्षण या विषयावर वंचितने फोकस केला असून शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या किमान आधारभूत किमतीवर महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत वंचितने किती जागा मागितल्या, यावर कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. पुढील बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT