Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar | Nitin Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Nitin Deshmukh: महायुती सरकारकडून 20 कोटींच्या निधींसाठी अडवणूक; ठाकरेंच्या आमदारानं बांधकाम विभागातच मारली बैठक

Uddhav Thackeray Shivsena News: एकनाथ शिंदे यांच्या बंडात आमदार नितीन देशमुख सहभागी झाले होते. सर्व गाड्यांचा ताफा गुजरातच्या वाटेवर असताना ते हिसका देऊन पळून आले होते. नागपूरमार्गे त्यांनी अकोला गाठले होते.

Rajesh Charpe

Akola News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत राहतात. महायुती सरकार आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी 20 कोटींच्या निधीला मंजुरी देत नसल्याने नितीन देशमुख (Nitin Deshmukh) थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. आपण सुचवलेल्या कामांना तांत्रिक मान्यता दिली नाही, तर मोठे आंदोलन उभारण्याचाही इशारा त्यांनी दिला. यापूर्वी त्यांनी अकोलाच पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याविरोधात तोफ डागली होती.

एकनाथ शिंदे यांच्या बंडात आमदार नितीन देशमुख सहभागी झाले होते. सर्व गाड्यांचा ताफा गुजरातच्या वाटेवर असताना ते हिसका देऊन पळून आले होते. नागपूरमार्गे त्यांनी अकोला गाठले होते. त्या घटनेमुळे देशमुख चर्चेचा विषय झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक उलटसुलट दावे केले होते. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे राजकारण बघून देशमुख यांनी आपला मूड बदलल्याचे बोलले जाते.

विशेष म्हणजे ते पुन्हा निवडून आले. आता आपली आर्थिक कोंडी केली जात आहे, मतदारसंघात विकास कामे करू दिली जात नाही, निधी दिला जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. मध्यंतरी त्यांनी अकोला जिल्हा परिषदेचे सर्कल भाजपच्या (BJP) दबावाखाली तयार केले जात असल्याचा आरोप केला होता.

बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी २० कोटींच्या कार्यालयाला मंजुरी मिळाली आहे. यास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. असे असताना तांत्रिक मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे नितीन देशमुख आपल्या समर्थकांना घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागात धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.

आपल्या मतदारसंघातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवल्या जात आहे. अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. 20 कोटींचा निधी रस्त्यासाठी मंजूर झाला आहे. असे असताना तांत्रिक मान्यता दिली जात नाही. अधिकारी टाइमपास करीत असल्याचा आमदार देशमुख यांचा आरोप आहे.

20 कोटींच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली जात नाही, निविदा प्रक्रिया सुरू केली जात नाही हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचे सांगून नितीन देशमुख यांनी या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT