नागपूर : फसवणूक केल्या प्रकरणी आणि आरोपपत्रात फेरबदल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सतीश उकेंच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे, जमीन गैरव्यवहारात मनी लॉंड्रींगप्रकरणी सतीश उके प्रकरणात हा मोठा गौप्यस्फोट आहे.
ईडीकडून (ED) उके प्रकरणात दाखल चार्जशीटमध्ये फेरबदल केल्याचा आरोप सतीश उके (Satish Ukey) याचे वकील ॲड. रवी जाधव यांनी केला आहे. या संदर्भात उकेंच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात २ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जानंतर न्यायालयाने संबंधित चार्जशीट सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवण्याचा निर्देश दिला आहे.. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेते, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात ते सातत्याने आवाज उठवत राहिले आहे आणि असे ते नागपुरातील पहिले वकील आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील सतीश उके यांच्या घरी ३१ मार्च रोजी ईडीच्या पथकाने धाड घातली होती. जवळपास ६ ते ७ तासांच्या चौकशीनंतर सतीश उके व त्यांच्या भावाला अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात ईडीच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) मुंबईद्वारे ईसीआयआरसह केल्या जात असलेल्या चौकशीतून मुक्तता मिळावी आणि हे प्रकरण नागपूरला हस्तांतरित करण्यात यावे, अशी विनंती उके बंधूंनी ईडीच्या विशेष न्यायालयाला केली होती.
न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. तसेच, योग्य कायदेशीर मंचाकडे जाण्याची त्यांना मुभा मात्र त्यांना दिली. या प्रकरणी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी झाली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपात अॅड. सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके यांना ३१ मार्च २०२२ रोजी ईडी मुंबईने नागपुरातून अटक केली होती. सतीश उकेंचे वकील रवी जाधव यांच्या आरोपानंतर हे प्रकरण काय वळण घेते. हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.